पुणे : पुणे शहरातील अंमली पदार्थांच्या जाळ्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस सतत प्रयत्नशील आहेत. त्याच मोहिमेअंतर्गत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत परराज्यातील एका सराईत आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल ५.२९० किलोग्रॅम वजनाचे अफू बोंडे/टरफले हा नशाकरक अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची किंमत तब्बल ₹९५,२२०/- एवढी आहे.
ही कारवाई २६ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले आणि किरण साबळे हे गस्त घालत असताना ही माहिती मिळाली.
पद्मजा पार्क सोसायटीच्या भिंतीलगतच्या रस्त्यावर संशयित हालचाली दिसून आल्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपी मांगीलाल पुनाराम रहाड (वय २९ वर्षे, मूळ गाव करवाडा, ता. राणीवाडा, जि. जालौर, राजस्थान) हा आपल्या ताब्यात पोत्यामध्ये मोठ्या प्रमाणात अफू बोंडे बाळगताना आढळून आला. आरोपी पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील चाळीत सध्या वास्तव्यास होता.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक ३९३/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), १८(ख) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ २, श्री. मिलींद मोहीते, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. जितेंद्र कदम यांच्या सूचनेनुसार कार्यवाही पार पडली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, किरण साबळे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड आणि संदीप आगळे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
🔹 पुणे पोलिसांची ही कारवाई केवळ मोठा अंमली पदार्थाचा साठा उधळून लावणारी नाही तर शहरातील तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी महत्वाची पायरी ठरणार आहे.