वाघोली परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलिसांनी आणखी एक यशस्वी धाड टाकत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या टेम्पोमधून 1.502 किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणात इंदापूर तालुक्यातील तीन युवकांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांचा वाढता वापर व तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
संशयास्पद टेम्पोमुळे उलगडला गांजा तस्करीचा गुन्हा
दि. 07/12/2025 रोजी वाघोली पोलीस स्टेशनच्या पथकाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या सूचनेनुसार गस्त घालत असताना भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस एक काळ्या काचा असलेला पांढरा टेम्पो उभा आढळला.
-
टेम्पोमध्ये चालक अथवा अन्य व्यक्ती नसल्याने पोलिसांना संशय आला.
-
पोलिसांनी काही अंतरावर लपून निरीक्षण केले असता तीन व्यक्ती त्या टेम्पोकडे येऊन त्यात बसताना आढळल्या.
-
पोलिसांना पाहताच हे तिघेही घाबरून उतरू लागल्याने त्यांच्यावर संशय अधिक बळावला.

अटक केलेले आरोपी
-
सौरभ अशोक साबळे, वय 23, रा. रणगाव, ता. इंदापूर
-
समर्थ दत्तात्रय बनसोडे, वय 23, रा. कळंब, ता. इंदापूर
-
अमिन रहिमतुल्ला डांगे, वय 23, रा. वालचंदनगर, ता. इंदापूर
जप्त मुद्देमाल — एकूण किंमत ₹2,68,000
-
1.502 किलो गांजा – किंमत ₹30,000
-
मोबाईल फोन – किंमत ₹38,000
-
लहान टेम्पो – किंमत ₹2,00,000
एकूण जप्त मुद्देमाल: ₹2,68,000
या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं. 695/2025
NDPS Act कलम 8(क), 20(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सुरू — मोठ्या तस्करी रॅकेटचा धागा लागू शकतो
प्राथमिक तपासात आरोपीनाकडे सापडलेला गांजा विक्रीसाठी आणण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
तपास अधिकारी PSI वैजिनाथ केदार हे आरोपींच्या मोबाईल रेकॉर्ड, त्यांचे संपर्क, टेम्पोची हालचाल यावर चौकशी करत असून, या तिघांचे कोणत्या मोठ्या रॅकेटशी संबंध आहेत का? याची पडताळणी सुरू आहे.
कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली:
-
मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग — श्री. मनोज पाटील
-
मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 4 — श्री. सोमय मुंडे
-
मा. सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग — श्रीमती प्रांजली सोनवणे
पथक प्रमुख:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे,
PI (Crime) आसाराम शेटे,
PSI मनोज बागल,
PSI संदीप करपे,
आणि पोलिस अंमलदारांची टीम – पांडुरंग माने, साईनाथ रोकडे, दीपक कोकरे, विशाल गायकवाड, बाबासाहेब मोराळे, मंगेश जाधव, राम ठोंबरे इत्यादी.






