0
0
0
0
0

गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 17

पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई : अंमली पदार्थ आणि रोकड जप्त

0

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी कक्ष (ANC-02 आणि युनिट-06) यांनी संयुक्त कारवाई करत लाखोंचा अंमली पदार्थ आणि रोकड जप्त केली आहे. या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून तब्बल ₹76 लाख 1 हजार 710 किमतीचा अंमली पदार्थ तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने 15 ऑगस्ट 2025 रोजी विशेष सापळा रचून ही धडक कारवाई केली. तपासादरम्यान दोन...

शहरातील कुख्यात टोळीप्रमुख टिपू सतार टोळीचा पर्दाफाश, महिलांपासून वसुलीसाठी गंडवणुकीचा प्रयत्न, शेवटी पोलिसांची कारवाई

0

पुणे | दिनांक १७ जून २०२५ :- पुणे शहरातील हडपसर, सय्यदनगर आणि कालेबोळ परिसरात सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगारी टोळीचा मोठा भांडाफोड करण्यात आला आहे. टोळीचा प्रमुख रिझवान उर्फ "टिपू सतार पठाण" याने सात ते आठ जणांच्या साथीने पुण्यात गुन्हेगारीचे जाळे पसरवले होते. नागरिकांवर दबाव टाकून जमिनी, मालमत्ता, वसुलीचे प्रकार घडवले जात होते. या टोळीने एका महिलेकडून २० लाखांची मागणी...

दिल्ली-पुणे विमान प्रवासादरम्यान प्रवाशाच्या बॅगेतून ₹१.८० लाखांची चोरी; विमानतळ सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

0

पुणे: विमान प्रवासादरम्यान पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून दिल्ली-पुणे एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशाच्या बॅगेतील ₹१.८० लाखांची रोकड चोरीला गेली आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी प्रासन नाहर (वय ४२, रा. यमुनानगर, निगडी) हे दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाने प्रवास करत होते. त्यांनी आपली बॅग दिल्लीतील मेट्रो स्थानकावरील चेक-इन काउंटरवर दिली होती. मात्र, पुणे विमानतळावर बॅग मिळाल्यानंतर त्यांनी ती उघडून...

अमरावतीत धक्कादायक घटना! महिला पोलिसाची सुपारी देऊन हत्या; पतीच निघाला खुनी

0

अमरावती शहरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या महिला पोलीस अंमलदार आशा धुळे-तायडे यांच्या गळा दाबून झालेल्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. या खळबळजनक प्रकरणात त्यांच्या पतीनेच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, प्रेमसंबंधातून ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपी राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असून त्याचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते....

नागपूरच्या गणेशपेठेतील ‘हॉटेल द्वारकामाई’ला बॉम्ब धमकी; सर्वजण सुरक्षित, पोलीस तपास सुरू.

0

नागपूर: शहरातील गणेशपेठ कॉलनी येथील द्वारकामाई हॉटेलला सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नागपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हॉटेलमधील सर्व व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवले. नागपूरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) राहुल मकनिकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "द्वारकामाई हॉटेलला बॉम्बची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. आम्ही तातडीने घटनास्थळी...

पावसाचा कहर! दिवे घाटात ढगफुटी, पिंपरीत वाहने वाहून गेली, पुणे शहरात शासकीय इमारती जलमय

0

पुणे | १४ जून २०२५ – राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवे घाट परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे प्रचंड पाणी साचून निसर्ग रौद्र रूपात अवतरला. दिवे घाटात मुसळधार पावसामुळे ओढे, धबधबे आणि पाण्याचे प्रवाह एकदम ओसंडून वाहू लागले. काही धबधब्यांनी इतकं रौद्र रूप धारण केलं की...

पुण्यात पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करून पसार झालेल्या सराइतांचा सोलापूरमध्ये पर्दाफाश

0

पुणे: हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत गंभीर घटना घडली. दोन दुचाकीस्वारांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, आरोपींनी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाले. आरोपी निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १९, तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय २०, हडपसर), आणि अमरसिंग जग्गरसिंग टाक (वय २३) यांना सोलापूर परिसरातून अटक करण्यात...

येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! आठ लाखांच्या कपड्यांची चोरी करणारा आरोपी जेरबंद, ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे | २६ एप्रिल २०२५ :- येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या अत्यंत कसोशीच्या आणि नियोजनबद्ध कारवाईतून कल्याणीनगर येथील जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून सुमारे आठ लाख रुपये किंमतीचे कपडे चोरणारा आरोपी गणपत डांगी याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. या कारवाईने परिसरात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे.  बातमीदाऱ्याच्या माहितीतून सापडला धागा दि. १९ एप्रिल २०२५ रोजी तपास पथकातील श्रेणी...

पुण्यात १ किलो अफिम जप्त! एका आरोपीला अटक; २१ लाख रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करी रोखण्यात यश!

0

पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठं यश मिळवत १ किलो अफिम जप्त केलं असून एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात ५२ वर्षीय नथुराम जीवनराम जाट, मूळचा राजस्थानचा रहिवासी, याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून २१ लाख रुपयांच्या अफिमचा साठा सापडला असून, त्याचा वापर अमली पदार्थांच्या अवैध व्यापारासाठी होणार असल्याचा संशय आहे. माहितीनुसार, आरोपी नथुराम जाट हा एका लाल...

रेल्वेतील साखळी खुनांचा उलगडा! वलसाड पोलिसांनी हरियाणातील सिरीयल किलरला अटक.

0

वलसाड: रेल्वे मार्गांवर खळबळ माजवणाऱ्या सिरीयल किलरला वलसाड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हरियाणाच्या रोहतकमधील राहूल सिंग जाट (२९) या आरोपीने गेल्या एका महिन्यात पाच खून केल्याची कबुली दिली आहे. वलसाडमधील १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या या कुख्यात आरोपीला वलसाड पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून ताब्यात घेतले. प्रकरणाचा उलगडा: नोव्हेंबर १४ रोजी वलसाडमधील उधवाडा रेल्वे स्थानकाजवळ एका...

Copyright ©