पुणे | दिनांक १७ जून २०२५ :- पुणे शहरातील हडपसर, सय्यदनगर आणि कालेबोळ परिसरात सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगारी टोळीचा मोठा भांडाफोड करण्यात आला आहे. टोळीचा प्रमुख रिझवान उर्फ “टिपू सतार पठाण” याने सात ते आठ जणांच्या साथीने पुण्यात गुन्हेगारीचे जाळे पसरवले होते. नागरिकांवर दबाव टाकून जमिनी, मालमत्ता, वसुलीचे प्रकार घडवले जात होते. या टोळीने एका महिलेकडून २० लाखांची मागणी करत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कालेबोळ पोलीस स्टेशनमध्ये तब्बल ३७ विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टोळीमध्ये टिपूसह नऊ जणांचा समावेश असून त्यात इरफान, अजिमी उर्फ अंट्या पठाण, व इतर नावे आहेत. पोलीस तपासात या टोळीच्या प्रत्येक सदस्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे या गुन्हेगारी जाळ्याचे जाळे एवढे विस्तृत होते की पुण्याच्या विविध भागांतील नागरिकांना धमकी, जबरदस्ती, महिलांना त्रास, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये टोळीचा हात असल्याचे उघड झाले आहे. शहरातील जमीन व्यवहार, भाडेपट्टी, महिला हेरगिरी, वसुली, अशा विविध मार्गांनी ही टोळी अनेकांना गंडवत होती.
आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रेहिम पठाणचा पोलिसांच्या डोळ्यासमोर मृत्यू
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रेहिम याचा सोलापूरमध्ये पोलिसांच्या कारवाईदरम्यान मृत्यू झाला. शाहरुखच्या घरावर शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिस टीमला त्याने थेट “तुम मुझे फकडले का, आज तुम्हारा खेल खत्म करता हूं, मैं तुम्हे जिंदा नहीं छोड़ूंगा!” अशी धमकी देत गोळी झाडली. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल फायर केल्यावर तो जखमी झाला आणि उपचारादरम्यान मृत्यू पावला.
त्याच्याविरुद्ध घरातच पत्नीला मारहाण, जबरदस्ती वसुली, खंडणी, दहशत, आणि विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हे दाखल केले असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
गुन्ह्यांची नोंद व पुढील कारवाई:
गुन्हा क्र. १००/२०२४
कलम: भादंवि ३०८(२), ३२३(३), ३४७(२), ३४२, ५०६, ३७(१)(३), महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अंतर्गत
पोलिसांची गंभीर कारवाई
शहरात अशा प्रकारे टोळक्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांवर कडक पावले उचलत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गुन्हेगारीला रोख दिला आहे. या टोळीमुळे अनेक नागरिक भयभीत होते. पोलिसांनी दाखल केलेल्या १५ गुन्ह्यांपैकी अनेकांमध्ये जबरी चोरी, खंडणी, मारहाण, आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत कलमांचा समावेश आहे.
पुढील तपास व अटकसत्र
या प्रकरणी अजूनही काही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे अधिकारी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. कोणताही दबाव न घेता मुक्तपणे माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.