Home Breaking News अमरावतीत धक्कादायक घटना! महिला पोलिसाची सुपारी देऊन हत्या; पतीच निघाला खुनी

अमरावतीत धक्कादायक घटना! महिला पोलिसाची सुपारी देऊन हत्या; पतीच निघाला खुनी

अमरावती शहरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या महिला पोलीस अंमलदार आशा धुळे-तायडे यांच्या गळा दाबून झालेल्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. या खळबळजनक प्रकरणात त्यांच्या पतीनेच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, प्रेमसंबंधातून ही संतापजनक घटना घडली आहे.
आरोपी राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असून त्याचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या कारणावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद व्हायचे. पत्नी आशा यांनी याबाबत याआधी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
राहुलने पत्नीच्या मृत्यूचा कट एक महिन्यापूर्वीच रचला होता. त्याने आपल्या दोन मित्रांना पत्नीच्या खुनासाठी तब्बल 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. हत्येच्या दिवशी या दोघांनीच राहुलच्या मदतीने आशाचा गळा दाबून निर्घृणपणे खून केला. हत्या करून झाल्यावर त्यांनी 25,000 रुपये ॲडव्हान्स घेतले आणि ते फरार झाले.
हत्या लपवण्यासाठी आरोपी राहुलने प्रथम चोरीचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या बारकाईने तपासामुळे खऱ्या कटाचा पर्दाफाश झाला. राहुलला अटक करण्यात आली असून दोन्ही फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही घटना केवळ एक गुन्हा नसून, प्रेमविवाह आणि विश्वासघात यामधील विषारी गुंता समाजासमोर मांडणारी आहे. आशा आणि राहुल यांचा प्रेमविवाह होऊनसुद्धा, पतीच्या बेवफाईमुळे एका कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचा अमानुष अंत झाला.
पोलीस यंत्रणा लवकरच या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.
खून की एक संतापजनक कहाणी – पतीनेच पत्नीचा जीव घेतला!
🔹 पोलीस तपासातून खळबळजनक खुलासा
🔹 पाच लाखांची सुपारी देऊन पत्नीची हत्या
🔹 दुसऱ्या महिलेशी संबंधातून घडले हत्याकांड
🔹 फरार आरोपींचा शोध सुरू, पती गजाआड