गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 67

फरासखाना पोलिसांची धडाकेबाज कारवाई — ‘एक किलो सोने’ चोरी करणारा कामगार सात राज्यांत पळूनही अखेर जेरबंद; १.२७ कोटींचा मुद्देमाल सुरक्षित

0

पुणे — शहरात खळबळ उडवणाऱ्या ‘एक किलो सोने चोरी’ प्रकरणाचा फरासखाना पोलिसांनी थरारक उलगडा केला असून, सात राज्यांत पळत राहून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर पकडला आहे. तब्बल १ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे एक किलो शुद्ध सोने सुरक्षित हस्तगत करण्यात पोलिसांना शंभर टक्के यश मिळाले आहे. 🔹 चोरीचा सिनेमासारखा प्रकार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी बुधवार पेठेतील Precious Refinery या दुकानात...

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसरमध्ये भव्य रूट मार्च; नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना

0

आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत हा रूट मार्च पार पडला. या रूट मार्चचा मुख्य उद्देश म्हणजे निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, समाजकंटकांवर वचक राहावा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना...

वानवडी परिसरात अल्पवयीन वाहनचोरांचा पर्दाफाश; तीन दुचाकी जप्त, पोलीसांची सतर्क कारवाई

0

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तत्पर आणि प्रभावी कारवाई करत अल्पवयीन दोन बालकांना वाहनचोरीच्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २६ जानेवारी २०२६ रोजी रामटेकडी औद्योगिक परिसरात नियमित पोलीस पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आली. पेट्रोलिंग सुरू असताना दोन तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार तात्काळ कारवाई करत पोलीसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. चौकशीत ही दोन्ही...

वाघोलीत अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई; २३ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

0

पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले असून, त्यानुसार वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. दि. १३ जानेवारी २०२६ रोजी तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना वाघोली ते केसनंद मार्गावरून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचण्यात आला. वाघोलीकडून येणाऱ्या...

मुंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई; दुकानांची तोडफोड करणारे आरोपी जेरबंद

0

पुणे : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत मुंढवा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. बी. टी. कवडे रोड, घोरपडी परिसरात दुकानांची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींना मुंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अल्पावधीत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास...

वाघोलीत पुन्हा मारहाण प्रकरणाने खळबळ; बकोरी रोडवरील कॅफेत झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0

वाघोली : वाघोली परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बकोरी रोड, जेएसपीएम कॉलेजजवळील ‘बैठक कॅफे’ येथे झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुणांमध्ये झालेला वाद अचानक हाणामारीत बदलल्याचे दिसत असून काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली...

जुन्या वैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; येवलेवाडी पोलिसांनी १२ तासांत आरोपी जेरबंद

0

पुणे | प्रतिनिधी —पुणे शहरातील येवलेवाडी परिसरात घडलेल्या निर्घृण खूनप्रकरणाचा छडा लावत येवलेवाडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. या जलद कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत, येवलेवाडी कमानीपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी एक धक्कादायक घटना घडली.आकाश कृष्णा...

पुणे शहरात रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ चे आयोजन; वाहतूक जनजागृतीसाठी पोलिसांचा पुढाकार

0

पुणे शहरात सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पुणे शहर वाहतूक विभागातर्फे “रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ व मुद्देमाल वितरण समारंभ” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. पुणे शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांच्या वतीने आयोजित या...

मोठी कारवाई : खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त

0

पुणे : Pune Police च्या गुन्हे शाखेतील युनिट ३ ने आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीला ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक...

तडीपार आदेशाचा भंग करणारा आरोपी जेरबंद! गुन्हे शाखा युनिट ३ ची कौतुकास्पद कारवाई

0

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतत सज्ज आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कोथरूड परिसरात तडीपार आदेशाचा भंग करून लपून बसलेल्या एका आरोपीस अचूक माहितीच्या आधारे पकडण्याची धडाकेबाज कारवाई. दि. १८ जून २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस पथक आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या निर्देशानुसार पेट्रोलिंग करत होते. सपोफौ पंढरीनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार अमोल काटकर...

Copyright ©