पुणे | प्रतिनिधी — पुणे शहरातील येवलेवाडी परिसरात घडलेल्या निर्घृण खूनप्रकरणाचा छडा लावत येवलेवाडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. या जलद कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत, येवलेवाडी कमानीपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी एक धक्कादायक घटना घडली. आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. फुरसुंगी, पुणे) या तरुणाचा जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून रस्ता अडवून निघृण खून करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सात आरोपींनी आकाश चाबुकस्वार याच्याशी वाद घालत त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच डोक्यात दगड घालून त्याचा जागीच मृत्यू घडवून आणला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
गंभीर गुन्हा, तात्काळ कारवाई
या प्रकरणी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा घडताच फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ यांनी तात्काळ दोन विशेष तपास पथके तयार करण्याचे आदेश दिले.
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध
सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव व पोलीस अंमलदार सुजीत मदन यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रमुख आरोपींचा शोध घेतला. या तपासात खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले —
इतर फरार आरोपींचा शोध पोलीस युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, पथकाचे कौतुक
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी कामगिरीसाठी येवलेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून, गुन्हेगारीविरोधात पोलिसांचा कडक संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.