पुणे — शहरात खळबळ उडवणाऱ्या ‘एक किलो सोने चोरी’ प्रकरणाचा फरासखाना पोलिसांनी थरारक उलगडा केला असून, सात राज्यांत पळत राहून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर पकडला आहे. तब्बल १ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे एक किलो शुद्ध सोने सुरक्षित हस्तगत करण्यात पोलिसांना शंभर टक्के यश मिळाले आहे.
🔹 चोरीचा सिनेमासारखा प्रकार
१६ ऑक्टोबर २०२५ रोजी बुधवार पेठेतील Precious Refinery या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातील लॉकर उघडून १०० ग्रॅमचे १० सोन्याचे बिस्किटे (एकूण १ किलो सोने) लंपास केले. याबाबत फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.
दुकानातील विश्वासू कामगाराकडून एवढ्या मोठ्या रकमेचा मुद्देमाल चोरीला गेल्याने व्यापारी व परिसरात खळबळ उडाली.
🔹 आरोपीचा ‘शार्प प्लॅन’ — मोबाईल बंद, ठिकाणे सतत बदलली
आरोपी :
प्रथमेश गणेश मंडले (वय १८, रा. पाचेगाव बु., सांगोला, सोलापूर)
गुन्हा केल्यानंतर आरोपीने स्वतःचा मोबाईल बंद केला आणि
📍 सातारा
📍 सांगली
📍 सोलापूर
📍 कोल्हापूर
📍 विजापूर (कर्नाटक)
📍 विजयवाडा (आंध्रप्रदेश)
अशा अनेक ठिकाणी राहण्याचे ठिकाण सतत बदलत पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला.
🔹 पोलिसांचे २० दिवसांचे ‘ऑपरेशन गोल्ड रिकव्हरी’
मा. पोलीस उप-आयुक्त कृषिकेश रावले यांच्या आदेशानुसार
प्रभारी अधिकारी उत्तम नामवाडे
आणि तपास अधिकारी पो.उ.नि. अरविंद शिंदे यांच्या टीमने आरोपीचा काटेकोर मागोवा घेतला.
दीर्घ पाळत, सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक इन्फॉर्मर नेटवर्क यांच्या मदतीने अखेर आरोपीला जत, सांगली येथून २९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.
🔹 सोने कुठे गेले? — आरोपीकडून धक्कादायक कबुली
चौकशीत आरोपीने सांगितले की,
त्याने काही सोने लपवून ठेवले होते तर उर्वरित सोने कोल्हापूरमधील कारागीराकडे विकले होते.
दुसरा आरोपी :
शकील बशीर मोमीन (वय ४५, रा. ८४० लाइन बाजार, छावा गल्ली, कोल्हापूर)
यालाही १० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.
दोघांकडून मिळून १,२७,००,०००/- रुपये किंमतीचे पूर्ण एक किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले.
🔹 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिसांच्या अचूक कारवाईचे कौतुक
ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली :
-
मा. अपर पोलीस आयुक्त — श्री. मनोज पाटील
-
मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १) — श्री. कृषिकेश रावले
-
मा. सहायक पोलीस आयुक्त — श्रीमती अनुजा देशमाने





