पुणे: व्यसनमुक्ती केंद्रात ‘अनुप’ यांची अमली पदार्थांच्या तृष्णेमुळे आत्महत्या.
पुणे: शहरातील नशामुक्ती केंद्रात एका युवकाने नशेच्या गोळ्या न मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजता हिंजवडी येथील नित्यानंद पुनर्वसन केंद्रात घडली. मृत तरुणाची ओळख अनूप लोखंडे (वय 21), रहिवासी ताडीवाला रोड अशी करण्यात आली आहे. माहितीनुसार, अनूपला ड्रग्सची लत होती. तो परिसरातील अवैध दारूविक्री करणाऱ्या राजू पवळेच्या मुलाकडून ड्रग्स विकत घेत असे. अनूप 1 ऑगस्टला...
मूक प्राण्यांचे हिरो: डॉ. राजेश भुरे आणि डॉ. पवन पोखरकर यांच्या निस्वार्थ सेवेची गौरवण्याजोगी कहाणी!
एका ८-वर्षांचा गोल्डन रिट्रीव्हर कुत्र्याच्या जीवनातील संकटकाळात डॉ. राजेश भुरे (MVSc) आणि डॉ. पवन पोखरकर (BVSc and AH) यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेने पशुप्रेमींच्या हृदयाला स्पर्श केला आहे. अनेक डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सना निदानच सापडत नव्हते, तेव्हा या दोन पशुवैद्यांनी एका दुर्मिळ आजारावर मात केली. असामान्य रोग, अवघड निदान कुत्र्याला दोन्ही डोळे बाहेर येणे (exophthalmos), दृष्टीचे ढळणे आणि वेदनारहित सूज अशी लक्षणे दिसून...
प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णी मैदानात; घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जोरदार प्रचार
पिंपरी-चिंचवड :- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – सर्वसाधारण ओपन महिला वॉर्ड मधून राधिका उल्हास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणाऱ्या राधिका कुलकर्णी यांनी मतदारांशी थेट संवाद साधत परिवर्तनासाठी संधी देण्याचे आवाहन केले आहे. प्रचारासाठी सादर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये घड्याळ...
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; सर्व धोकादायक रचनांची सात दिवसांत तपासणी करण्याचे आदेश!
पुणे | १८ जून २०२५ – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करून जिल्ह्यातील सर्व पूल, रस्ते, वाडे, धोकादायक इमारती, रेल्वे पूल, फलक व इतर सार्वजनिक संरचना यांची structural audit करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेत किमान चार नागरिकांचा मृत्यू झाला असून...
पुण्यात डॉक्टरची आत्महत्या; मोबाईलचा पासवर्ड कागदावर लिहून ठेवत संपवलं आयुष्य!
पुणे – सध्या वैद्यकीय क्षेत्रात एकामागोमाग एक डॉक्टर आत्महत्या करत असल्याच्या घटनांनी चिंता वाढवली असताना, पुण्यात आणखी एका युवक डॉक्टरने आयुष्य संपवले आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील रेडिओलॉजी विभागात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. श्याम व्होरा (वय 28) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलचा पासवर्ड ठेवलाय, पण प्रश्न अनुत्तरित या घटनेतील सर्वात रहस्यमय बाब म्हणजे, डॉ....
येरवडा खुल्या तुरुंगातून जन्मठेपेचा कैदी पसार; खून प्रकरणात सात वर्षे तुरुंगवास भोगत होता.
पुणे : येरवडा खुल्या तुरुंगातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी बुधवारी सकाळी पसार झाला. हा कैदी मागील सात वर्षांपासून खून प्रकरणात शिक्षा भोगत होता. अनिल मेघदास पाटेनिया (वय ३५, रा. म्हारळगाव, पोस्ट वराळ, राधाकृष्णनगरी, टिटवाळा, कल्याण, जि. ठाणे) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी वरिष्ठ तुरुंग अधिकारी राजेंद्र वसंत मारले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली...
मुंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई; दुकानांची तोडफोड करणारे आरोपी जेरबंद
पुणे : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत मुंढवा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. बी. टी. कवडे रोड, घोरपडी परिसरात दुकानांची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींना मुंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अल्पावधीत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास...
समर्थ पोलीसांची धडक कारवाई: दुचाकी चोरांना अटक, चोरीस गेलेल्या दोन दुचाकी जप्त
पुणे – समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अतिशय शिताफीने केलेल्या कारवाईत दोन दुचाकी चोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दोन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर प्रकरणात पुणे पोलीस दलाने पुन्हा एकदा आपली दक्षता आणि कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. दाखल गुन्हा क्रमांक १६६/२०२५ व १६८/२०२५ अन्वये, दोन नागरिकांनी आपल्या दुचाकी गाड्या पावर हाऊस चौक, रास्ता पेठ...
विमानतळ पोलिसांची चतुर कारवाई: सराईत गुन्हेगाराला अटक; दोन चोरीच्या दुचाकी जप्त
पुणे :- विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सक्रिय असलेल्या पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पाडत सराईत दुचाकी चोरट्याला रंगेहात अटक केली आहे. या अटकेमुळे दोन विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या दुचाकींचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक ५ मे २०२५ रोजी विमानतळ पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम लोहगाव येथून दुचाकी चोरून सध्या...
तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची धडाकेबाज बैठक
तळेगाव दाभाडे (पुणे) – तळेगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली जेसीबी कंपनीच्या मिटिंग हॉलमध्ये भव्य आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उद्योजकांची सुरक्षा, वाहतूक आणि पायाभूत सुविधा यावर भर देत आयुक्तांनी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले व तातडीने उपाययोजना...












