दिनांक ५ मे २०२५ रोजी विमानतळ पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम लोहगाव येथून दुचाकी चोरून सध्या आर.के. चौकाजवळील मोकळ्या मैदानात थांबलेला आहे. ही माहिती मिळताच तपास पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सापळा रचण्यात आला.