सामाजिक

Home सामाजिक Page 24

कस्पटे कुटुंबाला पिस्तुल दाखवणाऱ्या निलेश चव्हाणचा अखेर शिनेमा संपला! नेपाळ बॉर्डरवरून अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे मोठे यश!

0

पिंपरी-चिंचवड – वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाला संरक्षण देणारा व कस्पटे कुटुंबाला धमकावणारा निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या अटकेने प्रकरणात मोठा वळणबिंदू आला आहे. देशभरात शोधमोहीम, पोलिसांची सात पथकं सक्रिय! निलेश चव्हाण याला पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या चार आणि पुणे पोलिसांच्या तीन पथकांनी संयुक्तरीत्या देशभर शोधमोहीम राबवली. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान,...

चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त! भारती विद्यापीठ पोलिसांची तत्परता; दुचाकी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

0

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरी प्रकरणात महत्त्वाची कामगिरी बजावत एकाच आरोपीकडून दोन दुचाकी गाड्या जप्त करून वाहन चोरीचा मोठा कट उध्वस्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी प्रचंड बारकाईने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केली असून, आरोपीकडून आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी, स्पाईस गार्डन हॉटेल लेकटाऊन, पुणे येथे फिर्यादी...

“पुट्टपर्थीत भगवान श्री सत्य साई बाबा जन्मशताब्दी महोत्सव तेजोमय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती — आध्यात्मिकता, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मितीचे संदेश”

0

आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील वातावरण आज सकाळपासून भक्तीभाव, अध्यात्म आणि सकारात्मक उर्जेने भारून गेले होते. भगवान श्री सत्य साई बाबा जन्मशताब्दी महोत्सव या ऐतिहासिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळेच औचित्य लाभले. कार्यक्रमात प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या कार्यक्रमास— ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपति केंद्रीय मंत्री व खासदार...

महाराष्ट्रातील पहिला अनोखा आणि धक्कादायक प्रकार : महिलेने चुकून गिळली संपूर्ण टूथब्रश, डॉक्टर आणि तज्ञांची दखल.

0

पुणे - पुण्यात एका ४० वर्षीय महिलेने चुकून संपूर्ण टूथब्रश गिळल्याची अनोखी घटना घडली आहे. ही घटना ऐकून डॉक्टर आणि तज्ञांनाही धक्का बसला असून, भारतभरातील वैद्यकीय क्षेत्रात या प्रकारावर चर्चा सुरू झाली आहे. ही घटना महाराष्ट्रातील पहिलीच नोंदलेली घटना असून, ती डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड येथे नोंदवण्यात आली आहे. या दुर्मिळ घटनेविषयी अधिक माहिती देताना, डॉ. अभिजित कराड,...

पुणे व घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला! हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट

0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि घाटमाथ्याच्या भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः घाट विभागात पावसाचा जोर अधिक असून, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने घाट भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घाटात मुसळधार पावसाचे संकेत पावसामुळे वाहतूक, वीजपुरवठा आणि दरड...

‘सावधान रहा, सुरक्षित रहा’ हेच नवे ब्रीदवाक्य – गोपनीय माहिती शेअर न करता स्वतःचा बचाव करा; महिलांसाठी विशेष हेल्पलाईन उपलब्ध

0

पिंपरी-चिंचवड | सोशल मीडिया हे आजच्या घडीला संवादाचं महत्त्वाचं माध्यम ठरलं असलं, तरी याच माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग व सावध राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावर गुप्त माहिती शेअर न करता, योग्य प्रायव्हसी सेटिंग्ज ठेवून, अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट टाळून स्वतःचा बचाव करता येतो. मोबाईल क्रमांक, आधार-पॅन कार्ड फोटो, घराचा पत्ता यांसारखी माहिती सार्वजनिक करणे धोकादायक ठरू...

पालकमंत्र्यांची यादी जाहीर! धनंजय मुंडेंना धक्का, अजित पवार बीडचे नवे पालकमंत्री

0

मुंबई: राज्यातील पालकमंत्र्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत मोठे बदल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून धनंजय मुंडेंना डच्चू देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पालकमंत्री नियुक्तीबाबत ही यादी महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवारांकडे पुणे आणि बीडचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि...

हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश, तब्बल ₹७.०४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

पुणे शहर पोलिसांच्या हडपसर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, तब्बल ₹७,०४,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हडपसर व परिसरात महिलांना लक्ष्य करून चैन चोरीचे प्रकार वाढले होते. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत गर्दीच्या बाजारपेठा आणि मंदिर परिसरात महिलांच्या गळ्यातील चैन हिसकावण्याचे प्रकार घडत होते. या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी...

कोलकाता डॉक्टर बलात्कार-खून प्रकरण: IMA चा 24 तासांचा देशव्यापी संप आज; रुग्णालयांचे ओपीडी बंद, 5 प्रमुख मागण्या.

0

कोलकाता, 17 ऑगस्ट 2024: कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने 24 तासांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा संप शनिवार, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झाला आहे. IMA ने शुक्रवारी 5 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये...

पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये धडक कारवाई; ४.२७ कोटींचा एमडी जप्त, अंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेट उध्वस्त

0

पुणे : अंमली पदार्थविरोधी कारवाईत पुणे पोलिसांनी मोठे यश संपादन करत राजस्थानपर्यंत जाळे पसरलेल्या मेफेड्रॉन (एमडी) तस्करी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. ०३/०२/२०२६ रोजी...

Copyright ©