मतदान प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी, दि. १२ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान १५ जानेवारी रोजी व मतमोजणी १६ जानेवारी रोजी होत आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महापालिकेची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी ही प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिले. निगडी प्राधिकरण...
फरार आरोपीस येरवडा पोलिसांची शिताफीने जेरबंदी — मोक्का अंतर्गत मोठी कारवाई!
पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या पथकाने सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अखेर गजाआड करण्यात यश मिळवले आहे. हा आरोपी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात फरार होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि गुप्त बातमीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली. गुन्हा क्रमांक १८३/२०२५ अंतर्गत आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ११८ (२), ३५१(३)(५), आर्म्स...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांची निवड…
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सदर विशेष सभेत स्थायी समिती सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. स्थायी समिती सभापती पदासाठी प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात आली असता अभिषेक बारणे यांचा एकमेव अर्ज वैध ठरला. इतर कोणताही अर्ज...
“डोनाल्ड ट्रम्प यांनी जय भट्टाचार्य यांची राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे (NIH) संचालक म्हणून नियुक्ती”
वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व स्टॅनफोर्ड विद्यापीठातील वैद्यकीय अभ्यासक जय भट्टाचार्य यांची नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ (NIH) च्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. कोलकातामध्ये जन्मलेले जय भट्टाचार्य हे कोविड-19 महामारीदरम्यान अमेरिकेच्या धोरणांचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध होते. NIH संचालकपदाची जबाबदारी: NIH ही अमेरिकेतील सार्वजनिक वैद्यकीय संशोधनासाठी प्रमुख संस्था असून तिचे $47.3 अब्ज इतके मोठे बजेट आहे. या संस्थेचे संचालक...
पुणे पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’ कारवाई; तब्बल 1768 बुलेट सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला!
पुणे: पुणे शहरात वाढत्या बुलेट मॉडिफाय सायलेन्सरच्या कर्कश आवाजावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर वाहतूक शाखेकडून 'बुलेट सायलेन्सर विशेष मोहीम' राबवून तब्बल 1768 मॉडिफाय सायलेन्सर जप्त करण्यात आले असून त्यावर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग)...
जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांचा विशेष
पिंपरी:- जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी महापौर माई ढोरे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अॅड.गोरक्ष लोखंडे,माजी नगरसदस्या उषा मुंढे,अनुराधा गोरखे,अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे,सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, जनता...
सायबर फसवणुकीचा पर्दाफाश: सिम्बायोसिसमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणारा सराईत आरोपी थायलंड पळून जाताना अटक!
पुणे :- पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्थेच्या नावाचा गैरवापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करत, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कामगिरी बजावली आहे. सिम्बायोसिस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगत ऑनलाइन वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांना गंडा घालणारा कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी या सराईत गुन्हेगारास थायलंड पळून जाण्याच्या तयारीत असताना कोलकत्ता विमानतळावर अटक करण्यात आली. सायबर फसवणुकीचा मास्टरमाइंड पकडला फसवणूक...
मुंबईत भीषण ‘हिट अॅन्ड रन’ अपघात! बँद्रा सी लिंकजवळ ३८ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू; ट्रक चालक अटकेत
मुंबई :- मुंबईत पुन्हा एकदा निष्पाप पादचाऱ्याचा जीव रस्त्यावर गेला. बँद्रा-वर्ली सी लिंक टोल प्लाझाजवळील रस्त्यावर ३८ वर्षीय तुनतुन शहा या पादचाऱ्याला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामुळे जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी ओळखला बँद्रा पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर घटनास्थळी आढळलेला मोबाईल...
पुण्यात मोठी कारवाई: सिंहगड रोडवर परराज्यातील मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणारी महिला एजंट अटकेत!
सिंहगड रोड, पुणे पुणे शहरात मानव तस्करी व वेश्या व्यवसायावर कडक कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी एक मोठी कारवाई करत परराज्यातील मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या महिला एजंटला अटक केली आहे. या कारवाईत एका पीडित परराज्यातील महिलेची सुटका करण्यात आली आहे. गुप्त माहितीवरून कारवाई: पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सपना राजाराम कदम (वय...
हामास प्रमुख इस्माईल हनियाह यांची इराणच्या राजधानीत हत्या, गटाने केली पुष्टी.
हामास प्रमुख इस्माईल हनियाह यांची काल तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी "धोकेबाज झायोनिस्ट हल्ल्यात" हत्या करण्यात आली. गटाने सांगितले की हल्ल्याबाबत अधिक तपशील शोधण्यासाठी तपास सुरू आहे. हमास प्रमुख इस्माईल हनियाह आणि त्यांचे एक अंगरक्षक इराणमध्ये त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यात ठार झाल्याचे आज हमासने आपल्या निवेदनात सांगितले आहे. हमासने म्हटले आहे की इस्माईल हनियाह यांना मंगळवारी सकाळी तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी "धोकेबाज झायोनिस्ट...












