Home Breaking News “बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याचे!” – प्रभाग २५ (क) मधून अॅड. राधिका उल्लास...

“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याचे!” – प्रभाग २५ (क) मधून अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी मैदानात; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार

28
0
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह घेऊन त्या थेट मतदारांच्या दारात पोहोचत असून,
“बटन घड्याळाचे – वेळ बदलण्याचे!”
हा स्पष्ट आणि ठोस विकासाचा संदेश देत आहेत.
मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.००
सुशिक्षित, अभ्यासू आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेले नेतृत्व म्हणून अॅड. राधिका कुलकर्णी यांची ओळख आहे. त्या महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन समस्या प्रत्यक्ष समजून घेत असून, केवळ आश्वासनांपुरते न थांबता जमिनीवर उतरून उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज समस्या, स्वच्छता, आरोग्य सेवा, महिलांची सुरक्षितता, मुलांसाठी शिक्षण सुविधा आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत. “महानगरपालिकेचा विकास फक्त कागदावर न राहता प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला पाहिजे. प्रत्येक नागरिकाचा आवाज सभागृहात पोहोचवणे हीच माझी भूमिका असेल,” असे त्या ठामपणे सांगतात.
नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारे आणि अन्यायाविरोधात निर्भीडपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्या ओळखल्या जात आहेत. महापालिकेत निवडून गेल्यास प्रभागातील प्रत्येक प्रश्न सभागृहात ठामपणे मांडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या धोरणांवर विश्वास ठेवत प्रभाग २५ (क) मधील मतदारांनी अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या वॉर्डमध्ये परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू होणार, अशी भावना नागरिकांमध्ये बळावत आहे.