Home Breaking News पाडवा व अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ६१० किलो मोतीचूर लाडूचा विश्वविक्रम!

पाडवा व अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ६१० किलो मोतीचूर लाडूचा विश्वविक्रम!

42
0
पुणे / बाणेर – दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी एक अनोखा आणि अभिमानास्पद विक्रम रचला आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रायकर फार्म, बाणेर येथे तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करून Winners Book of World Records मध्ये “सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू” म्हणून नोंद झाली आहे.
या प्रचंड लाडूसाठी १५० किलो बेसन, ३०० किलो साखर आणि १५० किलो तूप वापरले गेले. लाडू तयार करण्याचे कार्य अत्यंत नियोजनपूर्वक आणि शुद्धतेने पार पडले. हा उपक्रम प्रेम, ऐक्य आणि आनंदाचा संदेश देणारा ठरला आहे.
या ऐतिहासिक लाडूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी Winners Book of World Records च्या चेअरपर्सन आणि अभिनेत्री मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी अधिकृतपणे विश्वविक्रम जाहीर केला.
कार्यक्रमादरम्यान १८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय बी.के. डॉ. दीपक हरके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर सेवाकेंद्राच्या संचालिका बी.के. डॉ. त्रिवेणी, आणि समृद्धी केटरर्सचे संचालक जालिंदर वाळके पाटील यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे — हा ६१० किलो लाडू चार अनाथ आश्रमांना दान करण्यात आला. समाजसेवेचा आणि मानवतेचा सुंदर संदेश देणाऱ्या या कृतीने सर्व उपस्थितांचे मन जिंकले. हा विश्वविक्रम केवळ एक गोड पदार्थ नव्हे तर “एकतेचा आणि सेवेचा प्रतीक” ठरला आहे.