Home Breaking News महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ :- निवडणूक कामकाजासाठी सुमारे १२ हजार जणांची नियुक्ती

महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ :- निवडणूक कामकाजासाठी सुमारे १२ हजार जणांची नियुक्ती

77
0
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रक्षागृह व आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे एकूण ४ हजार ७६५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश निर्गमित झाले होते त्यापैकी सुमारे ३ हजार ५७३ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती मनुष्यबळ कक्षाचे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.
महापालिका निवडणूकीच्या कामकाजासाठी  एकूण ४ हजार ७६५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह व आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात सकाळी ९ वाजलेपासून निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज निवडणूकीचे प्रशिक्षण घेतले नाही किंवा प्रशिक्षणास अनुपस्थित होते  प्रशिक्षणास हजर राहून प्रशिक्षण पुर्ण करावे, असे आवाहन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले आहे. तसेच जे अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहतील त्यांच्यावर लोक प्रतिनिधित्व अधिनियम कलम १४ (२) (३) (४) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त लोणकर यांनी दिली आहे.