महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 45

बावधनमधील पायदळ मार्गांची दयनीय अवस्था; “चालण्यासाठी जागा नाही” – सुजाता गोकळे यांची खंत

0

पुणे | २ जून २०२५ – पुण्यातील बावधन परिसरात पायदळ नागरिकांसाठी रस्ते म्हणजे एक जीवघेणं संकट बनलं आहे. शहरातील नागरी विकासाच्या नावे वाढणारी अनियोजित व अनियंत्रित बांधकामं, वाहनांच्या वाढत्या संख्येचा ताण, आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सामान्य नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. "बावधनमध्ये चालण्यासाठी जागाच उरलेली नाही," अशी ठाम प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या आणि स्थानिक रहिवासी सुजाता गोकळे यांनी दिली आहे. त्यांनी ही...

नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट घोटाळा: वकील सहित तीन जणांच्या २ कोटींची फसवणूक.

0

नाशिक: सायबर गुन्हेगारांनी तीन व्यक्तींना सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात वकील नीरज बापट, जयश्री जोशी आणि वृषाली पांढरे यांचा समावेश आहे. गुन्हेगारांनी त्यांना "डिजिटल अरेस्ट" करून भीती दाखवली आणि बँक खात्यातील रक्कम "संशयास्पद" असल्याचे सांगून पैसे बाहेर काढून घेतले. घोटाळ्याची पद्धत: सायबर गुन्हेगारांनी ED, CBI आणि कस्टम विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल केले. १६ वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून (८ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान)...

बनावट MHADA वेबसाइटद्वारे लॉटरीत घर मिळवून देण्याचे आमिष, मुंबईत दोन जण अटकेत.

0

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) बनावट पोर्टलद्वारे लोकांना फसवून घर देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर पोलिसांनी शनिवारी दोन जणांना अटक केली आहे. आरोपींनी बनावट वेबसाइटवर पेमेंट लिंक देखील अपलोड केली होती, ज्यामुळे सुमारे १५ जणांना फसवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या फसवणुकीची एकूण रक्कम सध्या ५० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे, परंतु ती वाढण्याची शक्यता...

पुणे वाघोलीत भांड्याच्या दुकानात चोरी करणारे तिघे आरोपी जेरबंद; पोलिसांची शानदार कामगिरी!

0

पुणे शहराच्या वाघोली भागात "श्री कृष्णा मेटल्स" नावाच्या भांड्याच्या दुकानात दिनांक ३१ जुलै रोजी रात्री चोरी करणाऱ्या चोरट्यांना वाघोली पोलिसांनी केवळ काही तासांत अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. चोरी झालेल्या रिक्षासह एकूण ५९,०१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपी व एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या चोरीची तक्रार दुकानाचे मालक प्रियंकानगरी, वाघोली...

अजित पवार यांचा भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू — बारामतीत ६ जणांचा समावेश

0

महाराष्ट्र | प्रतिनिधी :- आज सकाळी बारामती (पुणे जिल्हा) येथे झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंत पवार यांचं निधन झालं आहे. विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती विविध वृत्तसंस्थांनी यापूर्वी दिली आहे. अजित पवार हे नुकताच चार प्रचार सभांसाठी मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते. अपघात सकाळी लँडिंगच्या...

महापालिकेकडून मराठी भाषा गौरव दिनी आयोजित काव्य संमेलनाला रसिकांची दाद

0

पिंपरी : अक्षरांचा सुगंध, शब्दांची लय आणि माय मराठीबद्दलचा अपार अभिमान... अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड शहरातील कवींकडून मराठीच्या गौरवशाली परंपरेला काव्यात्मक अभिवादन करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी चिंचवड महापालिकेने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर , अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि लोककलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले होते....

हडपसरमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक!

0

पुणे | हडपसर | १० मार्च २०२५:- हडपसर परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीचा वाढता धोका लक्षात घेता पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आणि धक्कादायक कारवाई करत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली. 🔹 औषधांचा गैरवापर वाढता धोका – युवा पिढीला गंडा 🔸 उच्च किंमतीमुळे अवैध नशिले पदार्थ खरेदी करण्यापेक्षा अनेक तरुण सोप्या मार्गाने औषधांच्या सेवनाकडे वळत आहेत.🔸 या प्रकरणात अटक...

रायगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई : महाड MIDC मध्ये ८९ कोटींच्या केटामाईन अंमली पदार्थाचा पर्दाफाश!

0

महाड, रायगड | २४ जुलै २०२५: रायगड जिल्ह्यातील महाड MIDC परिसरात बेकायदेशीररित्या तयार करण्यात आलेले ८८.९२ कोटी रुपयांचे 'केटामाईन' अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, या कारवाईने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. ही धक्कादायक माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर, पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची तातडीने स्थापना करण्यात आली. त्यानंतर विविध विभागांतील पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने E-26/3, रोहन...

महानगरपालिका प्रशासनात AI क्रांती; लवकरच ‘डिजिटल गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म’ उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

राज्यातील महानगरपालिका प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिक-केंद्रित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म लवकरच उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या नव्या उपक्रमामुळे नागरी प्रशासनात डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा मिळणार असून, नागरिकांना सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, AI टूल्सच्या माध्यमातून तक्रार निवारण, मालमत्ता...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरचा हप्ता जमा होणार लवकरच; थकीत रकमेचाही निपटारा सुरू.

0

मुंबई : राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा दिलासा ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना पुन्हा चर्चेत आली आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. आता या योजनेतील डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. महिला लाभार्थ्यांसाठी आर्थिक मदत: महायुती सरकारने जुलै महिन्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. या योजनेत...

Copyright ©