Breaking News

Home Breaking News Page 55

राजकीय दिवाळीचा धमाका! अजित पवारांच्या ‘टिकल्यां’नंतर महेश लांडगेंचा ‘सुतळी बॉम्ब’; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची जोरदार ताकदप्रदर्शन

0

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून, यंदाची निवडणूक ‘राजकीय दिवाळी’ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बारामती गेस्टहाऊसमध्ये भाजपातील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश घडवून आणत ‘टिकल्या’ वाजवल्या. मात्र, याला तितक्याच जोरदार पद्धतीने प्रत्युत्तर देत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आज सर्वपक्षीय तब्बल २२...

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्तिप्रदर्शन मेळावा; माजी महापौरांसह अनेकांचा जाहीर प्रवेश

0

सांगली | प्रतिनिधी – सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, नवचैतन्य आणि संघटनात्मक बळाचे दर्शन घडले. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी महापौर श्री. मैनुद्दीन बागवान, माजी महापौर श्री. आनंदा देवमाने, तसेच अनेक माजी...

माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भेट; सुरू असलेल्या कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

0

बारामती | प्रतिनिधी – शेतकरीहित आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवत, आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याला महत्त्वपूर्ण भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान कारखान्यात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कारखान्याच्या यांत्रिकी विभाग, ऊस गाळप प्रक्रिया, साठवणूक व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना तसेच प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेताना कामांची गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि पारदर्शकता यावर विशेष...

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोड; काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

0

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – शहरातील राजकीय वर्तुळात मोठी हालचाल निर्माण करणारी घटना समोर आली असून, काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रशीद मामू व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात जाहीर स्वागत...

दुर्मीळ श्वसनमार्गातील हेमॅन्जिओमावर वेळेत उपचार; ८ महिन्यांच्या चिमुकलीला मिळाले नवे जीवन

0

मुंबई | १९ डिसेंबर – जन्मापासून श्वास घेण्यास त्रास सहन करणाऱ्या आठ महिन्यांच्या एका चिमुकलीला मुंबईतील नारायण हेल्थ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये वेळेवर निदान व उपचारामुळे नवे आयुष्य मिळाले आहे. या बालिकेला अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या ठरू शकणाऱ्या ग्रेड-३ एअरवे हेमॅन्जिओमा या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे तिच्या श्वसनमार्गात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. परिणामी, तिला श्वास घेण्यास तीव्र अडचण,...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या ग्रंथाचे भव्य प्रकाशन

0

मुंबई – भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा वेध घेणाऱ्या ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन आज मुंबई येथे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, इतिहास अभ्यासक, धर्मगुरू तसेच मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. या पुस्तकात भारतीय संस्कृतीचे आद्य प्रवर्तक मानले जाणारे राजा ऋषभदेव यांचे जीवन, तत्त्वज्ञान, समाजरचना आणि संस्कृती...

पिंपळे निळखमध्ये परदेशी नागरिकांनीच दिला ट्रॅफिक शिस्तीचा धडा; फुटपाथवरून दुचाकी हाकणाऱ्यांना रोखले

0

पुणे | पिंपळे निळख – भारतीय महानगरांतील ट्रॅफिक गोंधळ हा नवा विषय नाही. गर्दीच्या वेळी रस्ते ठप्प होतात, हॉर्नचा आवाज वाढतो आणि अनेक दुचाकीस्वार थेट फुटपाथवरून वाहन चालवण्याचा धोकादायक मार्ग निवडतात. मात्र पुण्यातील पिंपळे निळख परिसरात ही नेहमीची दृश्ये एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. रक्षक चौकाजवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दोन परदेशी नागरिक फुटपाथवरून दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना...

महालुंगे MIDC परिसरात भीषण अपघात; टेम्पो–रिक्षा धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

0

पिंपरी-चिंचवड | खेड तालुका – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील खेड तालुक्यातील महालुंगे MIDC परिसरात गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. प्रवासी रिक्षा आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने रिक्षा अक्षरशः चेंदामेंदा झाली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की रिक्षा लोखंडाच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झाली. घटनेची...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज; पारदर्शक व भयमुक्त निवडणुकीसाठी व्यापक तयारी

0

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा सुरळीतपणे पार पडावा, यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधने व सुरक्षेची काटेकोर आखणी करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदर्श आचारसंहितेची...

अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणूक प्रचारात शिवसेनेची शक्तिप्रदर्शन रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

अंजनगाव सुर्जी, अमरावती |अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने आज काढण्यात आलेल्या विराट प्रचार रॅलीला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनाची गरज असून, हे परिवर्तन केवळ शिवसेनेच्या माध्यमातूनच शक्य आहे, असे आवाहन यावेळी मतदारांना करण्यात आले. प्रचार रॅलीदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांनी फुलांची उधळण करत शिवसेना नेत्यांचे जल्लोषात स्वागत केले. लाडक्या बहिणींनी रॅली थांबवून...

Copyright ©