Breaking News
लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणारा आरोपी २ तासांत जेरबंद, ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक करत ४,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. दिनांक १२/०२/२०२६ रोजी फिर्यादी यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अंदाजे २,९०,००० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लोणी काळभोर...
बिगर संरक्षित वनक्षेत्रातील जलाशयांत मत्स्यव्यवसायाला गती; वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
२३ फेब्रुवारी २०२६ | मंत्रालय, मुंबई राज्यातील बिगर संरक्षित वनक्षेत्रातील जलाशयांमध्ये शासन मान्यता प्राप्त मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत मत्स्यव्यवसायास परवानगी देण्याबाबत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक वनमंत्री Ganesh Naik यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीस वन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वनक्षेत्रात असलेल्या तलाव, धरणे व जलाशयांचा शाश्वत पद्धतीने वापर करून स्थानिक...
खंडणी विरोधी पथक-२ची मोठी कारवाई; मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद
पुणे : Pune Police च्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत खंडणी विरोधी पथक-२ ने मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे. शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत ही यशस्वी कारवाई करण्यात आली. मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. तसेच मोक्का गुन्ह्यातील फरारी व पाहिजे...
पिंपळे गुरवमध्ये चार गोदामांना भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
पिंपळे गुरव (पिंपरी-चिंचवड) : पिंपळे गुरव येथील भाऊ नगर परिसरातील विश्वकर्मा मंदिराजवळ काल सायंकाळी चार गोदामांना अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. प्रारंभी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच Pimpri Chinchwad Municipal Corporation च्या अग्निशमन विभागाने तात्काळ हालचाल...
मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात BMC ची धडक मोहीम; आयुक्त भूषण गगराणी यांची दादरमध्ये अचानक पाहणी
मुंबई महानगरातील रस्ते आणि पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यासाठी तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. Brihanmumbai Municipal Corporation (BMC) प्रशासनाच्या वतीने ही कारवाई प्रभावीपणे राबवली जात असून शहरातील विविध विभागांमध्ये सातत्याने पाहणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त Bhushan Gagrani यांनी आज एफ दक्षिण, एफ उत्तर आणि जी उत्तर विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अचानक...
पुण्यात उंद्री रस्त्यावर भीषण अपघात टळला; महिला आणि लहान मूल थोडक्यात बचावले, रहिवाशांनी PMC कडे तातडीच्या कारवाईची मागणी
उंद्री (पुणे) – उंद्रीतील नायटी इस्टेट ते कंट्री क्लब दरम्यान मंगळवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एक महिला आणि तिचे लहान मूल थोडक्यात जीव वाचवून बचावले. पाण्याचा टँकर जोरात धडक दिल्याने त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर पडली. काही सेंकदांचाच फरक होता, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेमुळे पुन्हा एकदा उंद्री परिसरातील बेकायदेशीर बांधकामं, रस्त्यांवरील अतिक्रमणं आणि बिनधास्त...
महाराष्ट्र–पंजाब आध्यात्मिक नात्याला नवी दिशा; संत नामदेवांच्या घुमान येथे संतपीठाचा अभ्यास दौरा संपन्न
पिंपरी चिंचवड: शीख संप्रदायाचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत परंपरेतील अनेक संतांच्या वाणीसह संत शिरोमणी संत नामदेव यांच्या अभंगांचा समावेश आहे. ही बाब महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारी ठरते. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा हा सांस्कृतिक वारसा दोन्ही राज्यांना एका सूत्रात बांधतो आणि राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर उदाहरण ठरतो, असे प्रतिपादन...
शिवनेरी गडावर इतिहासाला मानवंदना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संयुक्त उपस्थिती
जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या ऐतिहासिक शिवनेरी गडावर आज उपमुख्यमंत्री Sunetra Pawar आणि मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी संयुक्तरित्या उपस्थिती लावत शिवरायांना अभिवादन केले. राज्यातील जनतेसाठी हा क्षण अभिमानाचा ठरला. शिवनेरी गडावर आगमनानंतर दोन्ही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवभक्तांच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते. ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन...
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ लागू; २२ जानेवारी २०२६ पर्यंत जमावबंदी आदेश जारी
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, अस्खे सोडावयाची अस्त्रे...
“पिंपरी-चिंचवडमधील कारभारी बदला… शहराला नवा श्वास द्या!” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पिंपरी-चिंचवडकरांना थेट आवाहन
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामांमध्ये भ्रष्टाचार, निविदांतील रिंग, रस्ते कामांतील गैरप्रकार, कुत्र्यांच्या नसबंदीतील घोटाळे, डांबरी रस्त्यावर सिमेंट टाकण्यासारखे प्रकार, लाचप्रकरणात स्थायी समिती अध्यक्षाची अटक, कोयता गॅंगचा उच्छाद – अशा अनेक गंभीर घटना शहरात घडल्या आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीवर बोट ठेवण्याऐवजी, यात सुधारणा घडवून आणण्यासाठी “शहरातील कारभारी बदला” असे स्पष्ट आणि ठाम आवाहन शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना...












