Breaking News

Home Breaking News Page 280

महानगरपालिकेच्या शाळेतील लहान लहान विद्यार्थ्यांच्या हातून घडले पर्यावरणपूरक गणपती बाप्पा

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत शाळांमध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाडू माती आणि कागदापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कल्पनाशक्तीला व कलागुणांना वाव देत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणे , पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देणे,  त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. कार्यशाळेत शिक्षक...

मुंबईत भारत-चीन सहकार्याला चालना; चीनचे वाणिज्यदूत किन जी यांची महापौर रितू तावडे यांना सदिच्छा भेट

0

मुंबई : चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी आज Municipal Corporation of Greater Mumbai मुख्यालयातील महापौर दालनात मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांची सदिच्छा भेट घेतली. महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांनी रितू तावडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान भारत-चीन तसेच मुंबई आणि चीनमधील प्रमुख शहरांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापार-उद्योग,...

अजितदादांच्या विचारांना सलाम; परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हाला शिवमुद्रा संघटनेचा जाहीर पाठिंबा

0

परभणी :महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आयुष्यभर सामान्य माणसाच्या हक्कासाठी, शेतकरी–कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य आजही जनतेच्या मनात घर करून आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विकासकामांमुळे ग्रामीण भागाला नवी दिशा मिळाली. त्या कार्याची आठवण जपत आणि त्यांच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिवमुद्रा संघटनेने परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित...

पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्य; स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद-अजित पवार

0

पुणे : “भारत माता की जय”, “जय भवानी जय शिवाजी”, “गणपती बाप्पा मोरया” अशा घोषणांनी, शाळेच्या मुलांनी शिवकाळातील वेशभुषा केलेले शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण आणि सासवडकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारलेल्या वातावरणात ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याची सासवड नगर परिषद परिसरात सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झेंडी दाखवून या टप्प्याच शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष...

मुंबई फसवणूक प्रकरण! गिरगावच्या ७३ वर्षीय गुंतवणूकदाराची २६.५४ कोटींची फसवणूक; रिअल इस्टेट कंपनीच्या तिघा संचालकांवर गुन्हा दाखल

0

मुंबई | १८ जून २०२५ – आर्थिक फसवणुकीच्या एका धक्कादायक प्रकरणात, गिरगावचे ७३ वर्षीय रहिवासी चुन्नीलाल वर्धीचंद शाह यांची तब्बल ₹२६.५४ कोटींची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही फसवणूक शमिक एंटरप्रायझेस लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीने केली असून, हिरेणी व्हिला प्रकल्पात फ्लॅट देण्याच्या अमिषाने ही रक्कम घेतली गेली. कंपनीचे तिघे संचालक आरोपी हर्ष सकालचंद हिरानी, सुरेश प्रतापचंद हिरानी आणि...

“निष्ठा–समर्पण–शाश्वत विकास” हीच भाजपाची दिशा; पिंपरी-चिंचवडला नव्या नेतृत्वाची साथ – आमदार महेश लांडगे

0

पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदी आणि शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा लोकप्रतिनिधींच्या सभागृहाचे कामकाज सुरू झाल्याने शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी “निष्ठा, समर्पण आणि शाश्वत विकास” हीच सत्ताधारी...

मतदार यादीवरील हरकती व सूचनांची प्रक्रिया चोखपणे पार पाडा – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचे निर्देश

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात करण्यात आला आहेत. या यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी...

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला गती | ४७० कोटींचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा

0

पुणे : पुणेकरांसाठी वाहतुकीच्या मोठ्या समस्येत गणला जाणारा कात्रज-कोंढवा रस्ता अखेर वेगाने पूर्णत्वाकडे जाणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुणे महापालिकेने ठोस पाऊल उचलले आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेले तब्बल ४७० कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहेत. यामुळे जागामालकांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया वेगाने होऊन रस्त्याचे काम गतीमान होणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मूळतः ८४ मीटरचा आराखडा...

मुंबईतील बांधकामस्थळी मृत्यू प्रकरणात बिल्डरला मोठा झटका! – न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला

0

मुंबई, ४ नोव्हेंबर २०२५ – बांधकामादरम्यान झालेल्या सुरक्षा त्रुटींमुळे एका तरुणीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक भावेश संघराजका (वय ४३) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. संसकृती अमिन (वय २२) या तरुणीचा ७ ऑक्टोबर रोजी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १९व्या मजल्यावरून पडलेल्या सिमेंट ब्लॉकने जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर समाजात संतापाची लाट उसळली होती. न्यायमूर्ती टी. टी....

देशातील विद्युत चाचणी क्षमता अधिक मजबूत होणार; CPRI च्या महत्त्वपूर्ण बैठकीत सखोल आढावा

0

नवी दिल्ली : केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान (CPRI) यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविताना केंद्रीय ऊर्जा मंत्री मा.ना. श्री. मनोहर लाल यांनी संस्थेच्या चाचणी (टेस्टिंग) सुविधांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यावर सविस्तर व व्यापक आढावा घेतला. ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील गरजा लक्षात घेऊन CPRI च्या परीक्षण क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीदरम्यान, उच्च क्षमतेच्या विद्युत...

Copyright ©