पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात करण्यात आला आहेत. या यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले.





