गुन्हेगारी
पुणे पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’ कारवाई; तब्बल 1768 बुलेट सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला!
पुणे: पुणे शहरात वाढत्या बुलेट मॉडिफाय सायलेन्सरच्या कर्कश आवाजावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर वाहतूक शाखेकडून 'बुलेट सायलेन्सर विशेष मोहीम' राबवून तब्बल 1768 मॉडिफाय सायलेन्सर जप्त करण्यात आले असून त्यावर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग)...
पिंपरी-चिंचवडमध्ये १४ वर्षीय मुलीवर आईच्या प्रियकराकडून अत्याचार; आरोपी अटकेत.
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने शाळेतील शिक्षिकेला ही घटना सांगितल्यानंतर शाळेने तातडीने पोलिसांना कळवले. रावेत, ३० ऑगस्ट २०२४: रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय मुलीवर तिच्या आईच्या प्रियकराने कथितपणे अत्याचार केल्याचा आरोप आहे. तक्रार मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून आरोपीला हडपसर येथून अटक केली आहे. अटक...
फुरसुंगी हत्या प्रकरणातील आरोपी लातूरमधून जेरबंद — गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी यशस्वी कामगिरी!
फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पुणे शहर हादरले होते. मृताच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्याचे आढळून आले होते. ही घटना अत्यंत निर्घृण स्वरूपाची असून पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला. मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून मृताचे नाव हनिफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे) असे आहे. १० मे २०२५ रोजी...
सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई – वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याने वाहन चोरी प्रकरणात मोठी यशस्वी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून पाच मोटारसायकली, दोन घरफोड्यांतील लॅपटॉप आणि एक कॅमेरा हस्तगत करण्यात आला आहे. कसून तपास आणि पोलिसांची शक्कल सिंहगड रोड पोलिसांनी त्यांच्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्यांना कळाले की, काही संशयास्पद इसम एक Honda Activa मोपेड घेऊन नवले ब्रिजमार्गे जात...
मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप
राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी सजग आणि सावधगिरीचा इशारा देत आले आहेत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळतेय, असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं झाली, पण त्या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट सतत दिसून आली – मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एका विशिष्ट पक्षाची सुस्पष्ट उपस्थिती! त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर...
पुणे – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या गस्ती पथकाची वेळीच झालेली कारवाई; संभाव्य गंभीर गुन्हा टळला
कात्रज कोंढवा रोड परिसरात गावठी कट्ट्याची हाताळणी करत असलेल्या दोघा संशयितांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केल्याची महत्त्वपूर्ण कारवाई समोर आली आहे. या दोघांकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ₹३१,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, यामुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दिनांक ५ जून २०२५ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली...
मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला लुटणारा दुचाकीस्वार १२ तासांत गजाआड! पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे गुन्हेगार सापडला
धनकवडी परिसरात मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका महिलेला लुटून पसार झालेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करत मोठं यश मिळवलं आहे. या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या जलद आणि अचूक तपासामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दि. १६ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे सातच्या सुमारास फिर्यादी महिला सिध्दीविनायक मंदिराजवळील हिलटॉप सोसायटीच्या...
विदिशींसह दोन अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा पर्दाफाश!
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत दोन विदिशींसह दोन अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा पर्दाफाश केला आहे. सध्या वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांमुळे पुणे पोलीस सतर्क झाले असून, या संदर्भात विशेष मोहिम आखण्यात येत आहे. पोलिसांची कसून तपासणी आणि कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर यांनी तपास पथकाला निर्देश दिले होते. तपासादरम्यान पोलीस...
तिकीट परीक्षकाच्या सतर्कतेमुळे बनावट आरक्षित तिकीट पाठवणारा फसवणूक करणारा पुणे स्थानकावर जेरबंद.
पुणे: झेलम एक्सप्रेसमध्ये सतर्क तिकीट तपासनीसाने (TTE) रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) महत्त्वाची माहिती पुरवून बनावट आरक्षित तिकीट पाठवणाऱ्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला जेरबंद करण्यात मदत केली. हा प्रकार २३ डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर उघडकीस आला. फसवणूक करणाऱ्याची ओळख प्रविणकुमार मधुलार लोंढे अशी पटली असून, तो प्रवाशांना बनावट आरक्षित तिकिटांच्या मेसेजेस पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. त्याने झेलम एक्सप्रेससारख्या गाड्यांमध्ये स्वस्त...
हडपसरमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक!
पुणे | हडपसर | १० मार्च २०२५:- हडपसर परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीचा वाढता धोका लक्षात घेता पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आणि धक्कादायक कारवाई करत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली. 🔹 औषधांचा गैरवापर वाढता धोका – युवा पिढीला गंडा 🔸 उच्च किंमतीमुळे अवैध नशिले पदार्थ खरेदी करण्यापेक्षा अनेक तरुण सोप्या मार्गाने औषधांच्या सेवनाकडे वळत आहेत.🔸 या प्रकरणात अटक...
















