पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-३ ने धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. दि. ०२/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ कडील अधिकारी व अंमलदार वरिष्ठांच्या आदेशानुसार पर्वती व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दांडेकर...
जेष्ठ नागरिकाची लूट करणारा आरोपी अटकेत; चौकशीत खोपोलीतील माजी नगरसेवकाच्या खुनाची धक्कादायक कबुली
पुणे | प्रतिनिधी — पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जेष्ठ नागरिक लूटप्रकरणात मोठा खुलासा झाला असून, या गुन्ह्यातील फरार मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर त्याने खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खुनाची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पुणे आणि रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी साखळीवर प्रकाश पडला आहे. जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून लूट दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी...
जुन्या वैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; येवलेवाडी पोलिसांनी १२ तासांत आरोपी जेरबंद
पुणे | प्रतिनिधी —पुणे शहरातील येवलेवाडी परिसरात घडलेल्या निर्घृण खूनप्रकरणाचा छडा लावत येवलेवाडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. या जलद कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत, येवलेवाडी कमानीपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी एक धक्कादायक घटना घडली.आकाश कृष्णा...
२४ तासांत दरोडा उघड! मांजरीतील ‘महावीर ज्वेलर्स’ दरोड्यात ३ आरोपी अटकेत, ३ विधीसंघर्षीत बालक ताब्यात; लाखोंचे दागिने हस्तगत
पुणे — पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. मांजरी येथील महावीर ज्वेलर्स या सराफ दुकानात झालेला थरारक दरोडा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, युनिट-५ व युनिट-६ यांनी ३ आरोपींना अटक केली असून ३ विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर...
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा कडक प्रहार – मद्यधुंद व ट्रिपल सीट वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम; ९५२ जणांवर कारवाई
पुणे | शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणारे तसेच ट्रिपल सीट दुचाकी वाहनचालक यांच्याविरोधात कडक व धडक कारवाई केली आहे.दि. २ जानेवारी २०२६ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नियमभंग उघडकीस आला आहे. वाहतूक शिस्त अबाधित राखणे, रस्ते...
वाहतूक सुरक्षिततेचा संदेश देणारी शिस्तबद्ध मिरवणूक; नायगाव पोलीस परेड मैदानावर अंतिम परेड स्पर्धा उत्साहात
मुंबई — रस्ते सुरक्षा महिना उपक्रमांतर्गत आज नायगाव पोलीस परेड मैदानावर अंतिम परेड स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला @cpmumbaipolice हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम आणि रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. ग्रेटर मुंबईतील विविध भागांतील एकूण २९ शाळांचे मार्चिंग बँड व परेड पथक या स्पर्धेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी तालबद्ध...
गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि...
युवकांनी आधुनिक कलांना विकसित करण्याचे काम करावे-उपसंचालक उदय जोशी
पुणे युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्याच्यादृष्टीने 29 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 सा कालावधीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, निगडी येथे आयोजित सन 2025-26 या वर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाले. ग. दि. माडगूळकर नाट्यगृह निगडी येथे 31 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या पारितोषक वितरण समारंभासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक उदय जोशी, उपसंचालक माणिक पाटील, उपसंचालक युवराज नाईक, सहायक संचालक मिलिंद...
बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून सायकलिंगला नवसंजीवनी देण्यासोबतच पुणे शहराची ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येणार असून, ती यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यातील विद्यार्थी स्वयंसेवक व प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन...
मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या विविध कार्यालयास भेट
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निवडणूक संबंधित तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांनी आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनास भेट दिली तसेच विविध कक्षांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक यांना अभिरक्षा कक्ष, प्रस्तावित मतमोजणी कक्ष, आचारसंहिता कक्ष तसेच नामनिर्देशन...




