केएसबी लिमिटेडची तिसऱ्या तिमाहीत दमदार झेप; नव्या प्रकल्पांच्या जोरावर मजबूत आर्थिक कामगिरी
पुणे : जागतिक पातळीवर पंप आणि वाल्व निर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या केएसबी लिमिटेडने जुलै ते सप्टेंबर 2025 या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना अत्यंत प्रभावी आर्थिक वाढ नोंदवली आहे. विविध देशांत मिळालेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे, तांत्रिक नवकल्पनांमुळे आणि मजबूत ग्राहकविश्वासामुळे या तिमाहीत कंपनीची कामगिरी आणखी भक्कम झाल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे विक्री उत्पन्न सातत्याने वाढत असून, जागतिक आव्हानात्मक बाजारस्थितीतही केएसबीने उल्लेखनीय कामगिरी...
पुण्यात शाळेजवळील पानटपऱ्यांवर कारवाई – हडपसर पोलिसांची धडक मोहीम!
पुणे – शाळेच्या १०० मीटर परिसरात असलेल्या बेकायदेशीर पानटपऱ्यांवर हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, आज दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी ही धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तीन पानटपऱ्या हटविण्यात आल्या असून, त्यांच्या चालकांविरोधात कोफ्ता कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मगरपट्टा परिसरातील कारवाई हडपसर पोलिसांना परिसरातील स्थानिकांकडून तक्रारी मिळत होत्या की, कड वस्ती, मगरपट्टा...
बारामती-भीगवण रस्त्यावर भीषण अपघात: दोन प्रशिक्षणार्थी पायलट ठार, दोन गंभीर जखमी.
रविवारच्या सुट्टीवरून परतत असताना बारामती-भीगवण रस्त्यावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन प्रशिक्षणार्थी पायलट ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालवण्याच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघाताचा तपशील: बारामतीतील रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमीचे चार प्रशिक्षणार्थी पायलट टाटा हॅरिअर कारमधून भीगवण रस्त्यावरून परतत होते. पहाटे 3:15 वाजता जैनकवडी येथील एका वळणावर...
पत्रकार महिलांवर हल्ला: मंचरमध्ये वार्तांकन करत असलेल्या महिला पत्रकारावर भ्याड हल्ला; पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला?
मंचर, पुणे जिल्हा – १० जुलै २०२५ पुणे जिल्ह्यातील मंचर येथे एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. वार्तांकन करत असलेल्या महिला पत्रकारावर भ्याड हल्ला करण्यात आला असून, या घटनेने महाराष्ट्रात महिला सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही घटना सकाळ मीडिया ग्रुप अंतर्गत काम करणाऱ्या पत्रकारावर घडली आहे, अशी माहिती @SakalMediaNews कडून मिळाली असून संपूर्ण पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट...
खंडणी विरोधी पथक-२ कडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त
पुणे : पुणे शहरात खंडणी विरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. २६ एप्रिल २०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-२ कडील पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे आणि पवन भोसले यांना गुप्त माहिती मिळाली की, गणेश आप्पा मकवाने, वय २४ वर्षे, रा. गोसावी वस्ती, ओम साई जिम शेजारी, वडगाव बु, सिंहगडरोड पुणे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे आणि तो...
पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुण्यात आगमन!
पुणे – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीला हजेरी लावली. या महत्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेली, दमण-दीव यांच्यातील विविध विकासकामे, सहकार धोरणे आणि प्रशासकीय मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. या बैठकीत हे मुद्दे येणार चर्चेत 🔹 पश्चिम भारतातील सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणावर चर्चा🔹...
चतुःश्रृंगी पोलिसांची मोठी कारवाई! बाणेरमधील ‘फार्म कॅफे’ शेतात चालणारा अवैध हुक्का बार उध्वस्त — ४८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे :- पुणे शहर पोलिसांच्या चतुःश्रृंगी पोलिसांनी औंध-बाणेर लिंक रोडवरील शेतात अनधिकृतरित्या चालणारा हुक्का बार उध्वस्त करून अवैध व्यवसायाला आळा घातला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी जागेचा मालक, व्यवस्थापक आणि कामगारांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई ८ नोव्हेंबर २०२५ रोजी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान करण्यात आली. तपास पथकातील...
लातूरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ६१ उमेदवारांसह मैदानात – सभेत ठाम निर्धार
लातूर ही धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारी मराठवाड्याची महत्त्वाची भूमी आहे. डाळी, तेलबिया आणि धान्य व्यापारामुळे लातूरची ओळख देशभरात एक सक्षम व्यापारी केंद्र म्हणून आहे. अशा या लातूर भूमीत ग्रामदैवत सिद्धेश्वर-रत्नेश्वर, हजरत सुरज शहा वली आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नमन करून लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्त आयोजित भव्य सभेत उपस्थितांना संबोधित करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी...
समृद्ध कलेचा साक्षात्कार! त्रिशुंड गणेश मंदिरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला नटरंग अकॅडमीचा मंत्रमुग्ध करणारा नृत्याविष्कार
पुणे, सोमवार पेठ – भारताचा हजारो वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नृत्यकलेची परंपरा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक आगळावेगळा आणि अभिजात सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात पार पडला. सुमारे 300 वर्षे जुन्या आणि ऐतिहासिक वास्तू असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक भरतनाट्यम नृत्यप्रकार सादर करत नटरंग अकॅडमीच्या युवा कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्ट...
नवनगर प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी राज्य सरकार सज्ज – लवकरच कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक निर्णयाची शक्यता!
🔸 आता मिळकतींवर तुमचे संपूर्ण हक्क असणार! ८५ हजारांहून अधिक मिळकतधारकांना दिलासा🔸 भाजपा आमदार महेश लांडगे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी होण्याच्या मार्गावर🔸 ‘रेड झोन’मुक्ती, पुनर्विकास आणि शासकीय इमारतींचा हस्तांतरण प्रस्तावही मंजुरीच्या दिशेने पिंपरी-चिंचवड शहरासाठी आणि विशेषतः नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय लवकरच होणार आहे. प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली...














