Home Breaking News पुणे पोलीस सज्ज: ऐतिहासिक श्री गणेशोत्सव २०२५ सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त आणि अत्याधुनिक...

पुणे पोलीस सज्ज: ऐतिहासिक श्री गणेशोत्सव २०२५ सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

173
0
पुणे – पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मकतेचा महामेळावा. जगभरात कीर्ती पावलेला पुण्याचा “श्री गणेशोत्सव” यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान साजरा होणार असून, त्याची सांगता ६ व ७ सप्टेंबर रोजीच्या भव्य मिरवणुकांनी होणार आहे.
पुण्यात यंदा तब्बल ३,९५९ सार्वजनिक गणेश मंडळे आणि ७४,५९४ खाजगी गणेश मंडळे नोंदणीकृत असून, लाखो भाविक पुण्यासह आसपासच्या जिल्ह्यांतून दर्शनासाठी येणार आहेत. श्रद्धा, कलात्मक देखावे, पारंपरिक ढोलताशे, रोषणाई आणि सामूहिक शक्तीमुळे पुण्याचा गणेशोत्सव देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे.
या उत्सव काळात कोणत्याही प्रकारची अडचण, अपघात अथवा कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने भव्य नियोजन आणि तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा उपाययोजना राबवल्या आहेत.
सुरक्षा व नियोजनाचे प्रमुख मुद्दे
१. बैठका व समन्वय
पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस स्टेशन स्तरावर ८२ आढावा बैठका.
चौकी स्तरावर ३२ बैठका.
६० शांतता कमिटी बैठका व २४ महिला दक्षता समितीच्या बैठका घेण्यात आल्या.
मानाच्या गणपती मंडळांचे प्रतिनिधी, ढोल-ताशा पथके, डीजे व लाईट डेकोरेशन प्रतिनिधी तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठकांचे आयोजन.
२. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
Surveillance Cameras – संपूर्ण पुण्यात सीसीटीव्हीद्वारे चौकशी व नियंत्रण.
AI-Powered Video Analytics – संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई.
IP-Based Public Address (PA) System – गर्दी व्यवस्थापनासाठी सूचना.
Mobile Surveillance Vehicles (MSVs) – फिरते नियंत्रण कक्ष.
Aerial Surveillance via Drones – मिरवणुकांवर हवाई नजर.

GPS Trackers and Alert System – महत्त्वाच्या वाहनांवर व पथकांवर जीपीएस नियंत्रण.

Collaborative Monitoring with Mandals – मंडळांच्या मदतीने संयुक्त देखरेख.
Traffic Monitoring – वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्मार्ट मॉनिटरिंग.
Anti Drone Gun – संशयित ड्रोन निष्क्रिय करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान.
Wireless Set Deployment – १०० वायरलेस सेट्स व ४०० WT तैनात.
 पोलिसांचा निर्धार
पुणे पोलीसांनी स्पष्ट केले आहे की गणेशोत्सवात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक स्तरावर पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे.
“गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा आत्मा आहे. नागरिकांनी निश्चिंत राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, हीच आमची अपेक्षा आहे,” असे पोलिसांचे आवाहन आहे.