Home Breaking News खंडणी विरोधी पथक-२ कडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त

खंडणी विरोधी पथक-२ कडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त

194
0

पुणे : पुणे शहरात खंडणी विरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. २६ एप्रिल २०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-२ कडील पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे आणि पवन भोसले यांना गुप्त माहिती मिळाली की, गणेश आप्पा मकवाने, वय २४ वर्षे, रा. गोसावी वस्ती, ओम साई जिम शेजारी, वडगाव बु, सिंहगडरोड पुणे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे आणि तो वडगाव बु. पुणे परिसरात आहे.

गुप्त माहिती मिळाल्यानंतर, खंडणी विरोधी पथक-२ च्या पथकाने तातडीने त्या ठिकाणी रवाना होऊन गोसावी वस्तीच्या मागील कॅनल लगत पायवाटावरून गणेश मकवाने यास ताब्यात घेतले. तपास केला असता, त्याच्याकडे १ देशी बनावटीचे पिस्टल आणि १ जिवंत काडतुस सापडले.

यावर त्याच्यावर सिंहगडरोड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सिंहगडरोड पोलीस ठाण्यात सुरू आहे.

ही कार्यवाही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलिस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे आणि मा. सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कामगिरी खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विजय कुंभार, पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, पवन भोसले, संग्राम शिनगारे यांनी केली.