Home Breaking News चतुःश्रृंगी पोलिसांची मोठी कारवाई! बाणेरमधील ‘फार्म कॅफे’ शेतात चालणारा अवैध हुक्का बार...
ही धडक कारवाई ८ नोव्हेंबर २०२५ रोजी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान करण्यात आली. तपास पथकातील अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, ‘फार्म कॅफे’ (सर्वे नं. २२४, औंध-बाणेर लिंक रोड) या ठिकाणी शेतामध्ये बेकायदेशीररीत्या हुक्का बार सुरू आहे. माहितीची खात्री करून पोलिसांनी छापा टाकला असता, ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का फ्लेव्हर पुरवले जात असल्याचे आणि धुम्रपानासाठी अवैध हुक्का वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले.