पुणे

Home पुणे Page 42

पुण्यात गोळीबार करून फरार झालेल्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; ५ आरोपी ताब्यात, विदेशी पिस्तूल व मोटारसायकल जप्त

0

पुणे : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या धक्कादायक गोळीबार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठे यश मिळवले आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथक-१ यांच्या संयुक्त कारवाईत या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपींसह एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट...

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘बदाम’ ठरत आहेत गेमचेंजर – अभिनेत्री सोहा अली खान पुण्यात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केला अनुभव!

0

पुणे :- सोहा अली खान म्हणाल्या,जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि खूप ऍक्टिव्ह असल्याने. बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्‍वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूट्सदरम्यान देखील मला बदाम खायला आवडतात. ते मला पचायला जड न वाटता एनर्जी देतात. मी माझ्या मुलीच्या आहारात, तिच्या नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये...

श्री तुळशीबाग गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मदतनिधी वितरित

0

पुणे – गणेशोत्सव म्हटला की सर्वसामान्यांच्या मनात उत्साहाची लहर उसळते, मात्र त्याचवेळी अनेक मंडळे सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित घटकांसाठी विधायक कार्यही करत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला, ज्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर...

महाराष्ट्रात ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवण्याच्या दरांबाबत मोठी माहिती; अन्य राज्यांप्रमाणेच दर निश्चित!

0

मुंबई – राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचे दर महाराष्ट्रात अन्य राज्यांप्रमाणेच आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी गैरसमज टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP बंधनकारक! देशभरात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र...

राजीव गांधी प्राणी उद्यानात तब्बल १४ हरणांचा मृत्यू! वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता; प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल

0

पुणे, कात्रज | दि. १५ जुलै २०२५ :- पुण्यातील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वन्यजीवप्रेमींसाठी अत्यंत दुःखद आणि चिंताजनक ठरत आहे. हरणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र साथीचा आजार, अन्नातील बिघाड किंवा हवामानातील अनपेक्षित बदल ही संभाव्य...

अनैसर्गिक संबंधावरून वाद, रक्तरंजित खून… २४ तासांत आरोपी जेरबंद! विश्रामबाग पोलिसांची गून्हे उघडकीस आणण्यात विलक्षण कामगिरी

0

पुणे | ६ जून २०२५ – पुणे शहरात पुन्हा एकदा अनैसर्गिक संबंधावरून निर्माण झालेल्या वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंडई मेट्रो स्टेशनसमोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत अवघ्या २४ तासांत आरोपी रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. कातरड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याला अटक करून गुन्हा...

“एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेतून भक्ती आणि योगाचा संगम! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम भव्य उत्साहात संपन्न

0

पुणे | २१ जून २०२५ | सकाळी ७.३० वा. – जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात आज 'वारकरी भक्तीयोग' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या आध्यात्मिक आणि आरोग्यदायी उपक्रमात हजारो वारकऱ्यांनी योगासने करत 'हरिपाठ' आणि नामस्मरणाने वातावरण भक्तिरसात न्हालं. योग आणि वारीचा संगम – आरोग्य आणि अध्यात्माचं शक्तिशाली साधन मुख्यमंत्री...

पुणे : सेठ हिराचंद नेमचंद ट्रस्ट प्रकरणात ‘स्टेटस क्वो’ आदेश ३० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा धर्मादाय आयुक्तांचा निर्णय

0

पुणे | २८ ऑक्टोबर २०२५ पुण्यातील सुप्रसिद्ध सेठ हिराचंद नेमचंद मेमोरियल ट्रस्ट (PTR No. E-1634) या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोल कलोटी यांनी पूर्वी दिलेला “Status Quo” (स्थिती कायम ठेवावी) हा आदेश कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या आदेशाची मुदत आता ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने अॅड. योगेश पांडे यांनी बाजू मांडली, तर प्रत्युत्तरदार...

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्ट तर्फे उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना गौरव – ४६ मंडळांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान

0

पुणे : पुणे शहर पोलीस व विघ्नहर्ता ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ च्या गणेशोत्सव काळात सामाजिक उपक्रम, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक आणि आदर्शवत आयोजन करणाऱ्या ४६ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांचा गौरव करण्यात आला. यासोबतच या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या परिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे ठिकाण व मान्यवरांची उपस्थितीहा सोहळा दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पुणे येथे...

पुण्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! आणखी ५ नवीन सायबर पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव; पोलीस दलात एक हजार अधिक कर्मचाऱ्यांची भरती आवश्यक – आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

0

पुणे शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच, पुणे पोलीस दलाने मोठा निर्णय घेत आणखी पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांची मागणी केली आहे. सध्या शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यावर प्रचंड तक्रारींचा भार असल्यामुळे, नागरिकांची तक्रार नोंदवण्याची व तपासाची प्रक्रिया संथ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे औपचारिक प्रस्ताव सादर करण्यात आला...

Copyright ©