शैक्षणिक

Home शैक्षणिक Page 13

३५ लाखांच्या मालाच्या अपहाराचा थरार संपला! — लोणीकंद पोलिसांनी नंदुरबारमधून संपूर्ण माल हस्तगत करून आरोपीला जेरबंद केले

0

पुणे: अत्यंत कुशल तपास आणि तातडीच्या कारवाईत पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलिस स्टेशनने ३५ लाख रुपये किंमतीचा चोरीचा माल नंदुरबारमधून हस्तगत करत आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यापाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना मा. भगवती ट्रान्सपोर्ट कंपनी, रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याकडे घडली होती. कंपनीच्या कंटेनर ट्रक (क्र. MH-12-TV-1024) मध्ये हायर कंपनीचे १२० फ्रिज...

“पुणेकरांचा जनसहभाग अनोखा! मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या संकल्पानिमित्त ३०,३३८ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन”

0

पुणे शहराने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श समोर ठेवत इतिहास रचला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या संकल्पापोटी आयोजित ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३०,३३८ रक्तपिशव्यांचे संकलन करून नवा विक्रम केला आहे. या उपक्रमाअंतर्गत पुणे शहरातील ५६ रक्तदान शिबिरांचे जाळे उभे करण्यात आले होते. शहराच्या विविध भागांमध्ये युवापिढीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून...

पुणे जिल्ह्यातील नद्यांचे प्रदूषण नियंत्रणासाठी मोठे पाऊल; नवे प्रकल्प राबवणार, स्वच्छतेसह विकासकामांनाही गती

0

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने निर्णायक पावले उचलली आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीत नद्यांच्या पाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छतेकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्य सहकारमंत्री मुरलीधर मोहोल यांनी माहिती दिली की, छोट्या नाल्यांमधील पाणी थेट नद्यांत जाण्यापूर्वी प्रक्रिया होणार...

“पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार” – पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक स्वरूप देण्याचा निर्धार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता आणि अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पुणे शहराला ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, पुढील वर्षी हा महोत्सव ‘जागतिक पुस्तक महोत्सव’ म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी...

ऐतिहासिक लालमहल चौकात दहीहंडीचा जल्लोष; पुण्यात ‘डीजे-मुक्त दहीहंडी’ची नवी परंपरा सुरू

0

पुणे – गोकुळाष्टमीचा जल्लोष आणि गोविंदा-रे गोपाळाच्या जयघोषाने ऐतिहासिक लालमहल चौक पुन्हा एकदा थरारून गेला. हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत पुणीत बालन ग्रुपने ‘डीजे-मुक्त दहीहंडी’चा अनोखा उपक्रम राबवून एक नवा आदर्श घालून दिला. ढोल-ताशा, बॅंड, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि गोविंदांच्या उत्साहाने परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यात राधेकृष्ण ग्रुपच्या खेळाडूंनी सात थर रचत दहीहंडी फोडण्याचा बहुमान पटकावला. पुण्यातील २६ सार्वजनिक मंडळांनी मिळून संयुक्त...

२३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर Axis Bank च्या वरिष्ठ उपाध्यक्षांचा भावनिक निरोप; अमिताभ चौधरी व अमृता फडणवीस उपस्थित

0

मुंबई : तब्बल २३ वर्षांपूर्वी एक तरुण मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून बँकिंग क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आज वरिष्ठ उपाध्यक्ष (Senior Vice President) पदावरून निरोप घेत भावनिक प्रवासाला पूर्णविराम दिला. Axis Bank मध्ये सुरू झालेला हा प्रवास केवळ नोकरीपुरता मर्यादित न राहता आयुष्याचा अविभाज्य भाग ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या कारकिर्दीत शाखा संचालनापासून कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी व्यवस्थापन ते ग्राहक संबंध अशा...

गणेशोत्सवासाठी ध्वनिक्षेपक वापरास ७ दिवसांची परवानगी – जिल्हाधिकारी डूडी यांचा आदेश

0

पुणे : महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो. राज्य शासनाने याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिक्षेपक (लाउडस्पीकर) आणि ध्वनिवर्धक वापरासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी विशेष परवानगी जाहीर केली आहे. या आदेशानुसार, गणेशोत्सवाच्या काळात एकूण ७ दिवस सकाळी...

नवभारत टाइम्सच्या ७५व्या स्थापना दिनानिमित्त विलेपार्ले येथे भव्य सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

0

मुंबई : विलेपार्ले येथे आयोजित Navbharat Times च्या ७५व्या स्थापना दिन सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. गेल्या सात दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या वृत्तपत्राने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर प्रभावीपणे प्रकाश टाकत वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis, खासदार Milind Deora तसेच Maharashtra Times चे संपादक पराग...

‘आदर्श आणि समृद्ध गाव’ संकल्पपुर्तीतून राज्य व राष्ट्राच्या विकासाला नवा वेग

0

पुणे : महाराष्ट्रात ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आदर्श आणि समृद्ध गाव’ हा संकल्प, ज्याच्या पूर्तीतून केवळ राज्याचाच नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गाव हे देशाचे मूलभूत घटक असून, प्रत्येक गाव विकसित झाल्यासच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. शाश्वत शेती,...

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत टाकला पहिला मत

0

नवी दिल्ली | देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठीची अत्यंत महत्त्वाची निवडणूक आज सकाळपासून संसदेच्या परिसरात सुरू झाली आहे. सकाळी अचूक १० वाजता मतदानाला प्रारंभ झाला आणि सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला मताधिकार बजावला. थेट लढत रंगलीया निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार जस्टिस (नि.) बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत रंगली आहे. त्यामुळे निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. मतदान व...

Copyright ©