Home Breaking News “घड्याळाचा गजर, विकासावर नजर!” – प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णींचा निर्धार

“घड्याळाचा गजर, विकासावर नजर!” – प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णींचा निर्धार

29
0
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प घेऊन ॲड. राधिका उल्हास कुलकर्णी मैदानात उतरल्या आहेत.
“सर्वांच्या विकासासाठी एक मत – राधिका साठी!” हा केवळ नारा नसून, सर्वसामान्यांच्या मनातील अपेक्षांचा आवाज बनत आहे.
विश्वासाचं नातं जपणारा उमेदवार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राधिका कुलकर्णी यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. पाणी, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आणि तरुणांच्या संधी – या प्रत्येक मुद्द्यावर ठोस काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
“घड्याळाचा गजर, विकासावर नजर!” या घोषणेतून त्या स्पष्टपणे सांगतात की, आता केवळ आश्वासनांची नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची वेळ आहे. शिक्षित, कायद्याची जाण असलेली आणि सर्वसामान्यांसाठी सदैव उभी राहणारी कार्यकर्ती म्हणून त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
शनिवार पेठ आणि महात्मा फुले मंडई परिसरात त्यांनी घरोघरी जाऊन संवाद साधला असून, नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला, युवक, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक सर्वच घटकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. “आपलीच मुलगी, आपलीच बहीण” अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. या निवडणुकीत प्रभाग २५ (क) मधील मतदार केवळ उमेदवार निवडणार नाहीत, तर विकासाची दिशा ठरवणार आहेत. राधिका कुलकर्णी यांचा ठाम विश्वास आहे की, एकजुटीने आणि विश्वासानेच खरा बदल घडवता येतो.
त्यांचा संदेश स्पष्ट आहे –
विकास हा भाषणात नाही, तो रस्त्यावर दिसायला हवा.
आणि याच विचारातून प्रभागात नवं नेतृत्व घडवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.