सामाजिक

Home सामाजिक Page 34

मनसेकडून मोठी घोषणा : मुंबई उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी जाहीर केली

मुंबई | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय निर्णय घेतला असून, मुंबई उपशहर अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी आज मा. राजसाहेब ठाकरे यांनी अधिकृतपणे जाहीर केली. या घोषणेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण मुंबई उपशहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी जाहीर करताना राजसाहेब ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांच्या संघटनात्मक कामाचा, जनतेशी...

मुंबई महापालिका निवडणूक : मुलुंड पश्चिम प्रभाग १०७ मधून डॉ. नील सोमय्या यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज भाजपचे युवा नेते डॉ. नील सोमय्या यांनी मुलुंड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १०७ मधून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला. या अर्ज दाखल कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, आमदार मिहीर कोटेचा तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. नील सोमय्या यांनी माध्यमांशी...

पुण्यात मद्यपी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; ४ दिवसांत २४२ जणांवर कारवाई

पुणे | दि. 29 डिसेंबर 2025 पुणे शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी २५ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत सलग चार दिवस विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पुणे शहरातील विविध प्रमुख चौक, रस्ते व...

वानवडी पोलिसांचा धडाका! टेम्पोचा पाठलाग करून १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह ४ आरोपी अटकेत

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात अवैध दारूविक्री व वाहतुकीविरोधात वानवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी आणि धाडसी कारवाई करत टेम्पोचा थरारक पाठलाग करून तब्बल १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह चार आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर दारूव्यवसायाला मोठा धक्का बसला असून, पोलिसांच्या सतर्कतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. ही कारवाई दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी वानवडी पोलीस...

पर्वती पोलिसांची मोठी कामगिरी; पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपी अटकेत, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर प्रभावी आळा घालत पर्वती पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चारचाकी पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपीस अटक करून तब्बल १४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांना कडक इशारा मिळाला आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा...

मांजरी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गांजा विक्री करणारा आरोपी अटकेत, ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे | प्रतिनिधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. याच कारवाईचा भाग म्हणून मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करून मोठी कामगिरी बजावण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलाकडून सातत्याने नाकाबंदी, पेट्रोलिंग, गुन्हेगार तपासणी तसेच अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार,...

२० महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा उघड; हडपसर पोलिसांनी फरार आरोपीला हरिद्वारमधून केले अटक

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी बजावली आहे. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात तब्बल २० महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस उत्तराखंडातील हरिद्वार येथून अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस दलाची दक्षता पुन्हा अधोरेखित झाली आहे.   उन्नतीनगर परिसरातील कॅनॉलमध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत...

निवृत्त ACP रेहाना गफूर शेख यांचा मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व कायदा-सुव्यवस्थेच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) रेहाना गफूर शेख यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे शिवसेनेच्या राजकीय व संघटनात्मक ताकदीत भर पडल्याचे मानले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतः रेहाना शेख यांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या...

“नवीन कर्मभूमीला वंदन” – काँग्रेस भवनातून देशसेवेचा नवा संकल्प

पुणे | प्रतिनिधी “नवीन कर्मभूमीला वंदन” अशा भावनिक शब्दांत काँग्रेस पक्षात प्रवेशानंतरचा पहिला अनुभव व्यक्त करत आज पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेस भवनात पहिल्यांदा अधिकृत पाऊल टाकण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा कणा असलेल्या आणि देशाला दिशा देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या या वास्तूत प्रवेश करताना केवळ अभिमान नव्हे, तर मोठ्या जबाबदारीची जाणीव झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यापूर्वी अनेकदा काँग्रेस भवनला भेट दिली असली, तरी...

सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी परस्पर समन्वय साधून सोहळा हा यशस्वी करावा. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ....

Copyright ©