Home Breaking News पुणे जिल्हा परिषद निवडणूक २०२६: भाजपाचा स्वबळाचा निर्धार, रणनिती ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक...

पुणे जिल्हा परिषद निवडणूक २०२६: भाजपाचा स्वबळाचा निर्धार, रणनिती ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

55
0

पुणे | १६ जानेवारी २०२६

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक माझ्या तसेच केंद्रीय मंत्री मा. मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनिती, संघटनात्मक मजबुती आणि उमेदवार निवडीसंदर्भात सविस्तर, सकारात्मक व भविष्याभिमुख चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान “पुणे जिल्हा परिषद निवडणूक भाजपाने स्वबळावरच लढवावी” असा ठाम आणि एकमुखी सूर उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उमटला. भाजपाची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेमध्ये असलेला विश्वास लक्षात घेता, ही निवडणूक स्वबळावर लढवणे हेच योग्य ठरेल, असा सर्वांचा ठाम विश्वास व्यक्त झाला.

यावेळी बूथ स्तरापासून जिल्हा पातळीपर्यंत संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक प्रभागात प्रभावी संपर्क अभियान राबवणे, तरुणांना मोठ्या प्रमाणात पक्षकार्यात सहभागी करून घेणे, तसेच स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचाराची दिशा ठरवणे, यावर विशेष चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास अधिक गतिमान करण्यासाठी भाजप कसा सक्षम पर्याय ठरू शकतो, याचे स्पष्ट चित्र उभे करण्याची रणनिती ठरवण्यात आली.

या बैठकीस पुणे उत्तर व पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष, वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे “स्वबळावर, विश्वासावर आणि विकासाच्या मुद्द्यावर” निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. ही बैठक म्हणजे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाच्या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण तयारीची नांदी ठरली आहे.