0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 101

PF धारकांसाठी आनंदाची बातमी! आता डिजीलॉकरवर मिळणार EPFO च्या सुविधा; एकाच ठिकाणी पासबुक, UAN कार्ड आणि इतर कागदपत्रं सहज उपलब्ध

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी सतत तांत्रिक सुधारणांची दिशा घेते आहे. आता आणखी एक मोठा बदल EPFO ने केला आहे – डिजीलॉकर (DigiLocker) वर PF संबंधित सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे पीएफ खातेदारांसाठी प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक झाली आहे. यापूर्वी केवळ UMANG ॲप द्वारे काही सुविधा दिल्या जात होत्या, मात्र 17...

पुणे पोलिसांची गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई! ६ सराईत गुन्हेगार तडीपार; परिमंडळ ५ ने दाखवली कडक भूमिका

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता आक्रमक धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ ५) यांच्या मार्गदर्शनाखाली ६ सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, गुन्हेगारी...

८ वर्षांपासून फरार असलेल्या घरफोडी गुन्हेगाराला पुणे पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! तीन आरोपी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट ५ ची मोठी कारवाई

पुणे : पुणे शहरातील घरफोडी गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आणि पोलिसांच्या अभिलेखावर "पाहिजे" असलेल्या तिघा गुन्हेगारांना अखेर गुन्हे शाखा युनिट ५ च्या सतर्क पथकाने रामटेकडी, हडपसर परिसरातून अटक केली. विशेष बाब म्हणजे प्रमुख आरोपी बिरजुसिंग रजपुतसिंग दुधाणी हा तब्बल ८ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता, आणि आता तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक श्री....

मुंबईत पावसाचा कहर! १० सेकंदांत टेकडीवरील घरे आणि भिंती कोसळल्या; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई | २३ जुलै २०२५ – मुंबईत संततधार पावसामुळे पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. शहरातील एका टेकडीवर उभारण्यात आलेली घरे आणि संरक्षक भिंती अवघ्या १० सेकंदांत जमीनदोस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब सुदैवाची ठरली आहे. मात्र ही...

पुण्यात उंद्री रस्त्यावर भीषण अपघात टळला; महिला आणि लहान मूल थोडक्यात बचावले, रहिवाशांनी PMC कडे तातडीच्या कारवाईची मागणी

उंद्री (पुणे) – उंद्रीतील नायटी इस्टेट ते कंट्री क्लब दरम्यान मंगळवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एक महिला आणि तिचे लहान मूल थोडक्यात जीव वाचवून बचावले. पाण्याचा टँकर जोरात धडक दिल्याने त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर पडली. काही सेंकदांचाच फरक होता, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेमुळे पुन्हा एकदा उंद्री परिसरातील बेकायदेशीर बांधकामं, रस्त्यांवरील अतिक्रमणं आणि बिनधास्त...

हिंजवडी वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; PMRDA कडून १६६ अतिक्रमणांवर कारवाई!

पुणे (हिंजवडी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)ने हिंजवडी आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीला प्रतिबंध घालण्यासाठी पीएमआरडीएने सखोल पावले उचलत, गेल्या १५ दिवसांत तब्बल १६६ अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्थेला दिलासा दिला आहे. हिंजवडी हा पुण्याचा प्रमुख आयटी हब असल्यामुळे येथे दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं आणि होर्डिंग्जमुळे प्रचंड...

गडचिरोलीच्या औद्योगिक वाटचालीला नवे बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी’च्या विविध प्रकल्पांचे कोनसरी येथे उद्घाटन

गडचिरोली | राज्यातील मागास व आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये औद्योगिकीकरणाचा नवा अध्याय लिहिला जात असतानाच, गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड'च्या विविध औद्योगिक प्रकल्पांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या प्रकल्पांतून स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील आर्थिक घडी मजबूत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. लोखंड, ऊर्जा, प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील या महत्त्वाकांक्षी...

स्पा सेंटरच्या आड वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; चार परदेशी व एक भारतीय महिला पिडीतांची सुटका!

पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई; “व्हिक्टोरिया थाई स्पा” मध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व युनिट-४च्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत विमानतळ परिसरातील “व्हिक्टोरिया थाई स्पा” मध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार परदेशी आणि एक भारतीय महिला अशा पाच पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय राबवला...

वाघोली पोलिसांची कारवाई – दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त!

पुणे | २२ जुलै २०२५ – पुणे शहरातील वाघोली व हडपसर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करून नागरिकांचे दागदागिने लांबवणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून ४ लाख ३३ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून अचूक कारवाई मा. वरिष्ठांच्या सूचनांनुसार सुरू असलेल्या गुन्हा...

पवना धरणात साठवण क्षमतेचा 78.87% पाणीसाठा; विसर्ग थांबवला, पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

मावळ तालुका | २३ जुलै २०२५ – मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात स्थित पवना धरणात आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार ७८.८७ टक्के पाणीसाठा झालेला आहे. मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात भरपूर जलसाठा झाला असून, पावसाचा जोर ओसरल्यामुळे धरणातून सुरू असलेला विसर्ग सध्या बंद करण्यात आला आहे. धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी 'दैनिक मावळ' शी बोलताना सांगितले की,...

Copyright ©