Home Breaking News प्रियाताई बेर्डे यांना कसबा संस्कार केंद्र, पुणे परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा; सांस्कृतिक...

प्रियाताई बेर्डे यांना कसबा संस्कार केंद्र, पुणे परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा; सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी गौरव

पुणे | कसबा पेठ : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख आणि समाजहितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रियाताई बेर्डे यांना कसबा संस्कार केंद्र, पुणे परिवाराच्यावतीने वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

केंद्राच्या हितचिंतक सहकारी आणि मार्गदर्शिका असलेल्या प्रियाताईंनी केवळ कलाक्षेत्रातच नव्हे, तर समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि संस्कारमूल्ये जपणाऱ्या उपक्रमांमध्येही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रातर्फे विशेष स्नेहसंदेश आणि संस्कृत-प्रणीत शुभेच्छा श्लोकांनी सजलेला अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्राच्या प्रमुख संयोजिका सौ. अनघा ताई अनिल दिवाणजी, ज्या भाजप प्रभाग क्र. १६ महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी प्रियाताईंसाठी भावपूर्ण शुभेच्छा दिल्या. “प्रियाताई बेर्डे यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असून, त्यांनी संस्कृती, समाजकार्य आणि राजकीय भान यांचा सुंदर संगम साधला आहे,” असे त्या म्हणाल्या.
शुभेच्छा संदेशात म्हटले आहे :
“शुभं जन्मदिनम्। जन्मदिनाय शुभकामनाः। भवतः जन्मदिनस्य जीवेत् शरदः शतम्।
सुदिनम् सुदिना जन्मदिनम् तव। भवतु मंगल जन्मदिनम्।
चिरंजीव कुरू कीर्तीवर्धनम्। चिरंजीव कुरू पुण्यावर्धनम्।
विजयी भवतु सर्वत्र सर्वदा। जगति भवतु तव सुयशगानम्।”
प्रियाताईंच्या पुढील आयुष्यासाठी उदंड आरोग्य, यश, दीर्घायुष्य आणि सातत्याने समाजहिताची दिशा देणारी प्रेरणा मिळावी, अशा भावना या शुभेच्छांमधून व्यक्त करण्यात आल्या.
या प्रसंगी केंद्रातील सर्व महिला सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी एकत्र येऊन प्रियाताईंच्या सामाजिक कार्याची उजळणी करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.