कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील टेलिकॉम क्षेत्रात आज एक मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या केवळ १८ तासांत तब्बल ६,५२९ जिओ ग्राहकांनी आपला सिमकार्ड नंबर एअरटेलमध्ये पोर्ट केला आहे. ही संख्या पाहता, जिओसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
स्थानिक पातळीवर याबाबत चर्चेला उधाण आले असून, ग्राहकांचा कल आता एअरटेलकडे झुकताना दिसतोय. नेटवर्क समस्यांपासून ते ग्राहक सेवा त्रुटीपर्यंत अनेक तक्रारी जिओच्या विरोधात सध्या दिसून येत आहेत. त्यातच एअरटेलकडून दिला जात असलेला जास्त डेटा, जलद इंटरनेट आणि खात्रीशीर नेटवर्क कव्हरेज यामुळे नागरिकांचा विश्वास पुन्हा एअरटेलकडे वळत आहे.
ग्राहकांचा अनुभव काय सांगतो? “आम्हाला वारंवार कॉल ड्रॉप आणि इंटरनेट स्लो स्पीडचा त्रास होत होता. अनेक तक्रारी करूनही तोडगा निघत नव्हता. अखेर एअरटेलमध्ये पोर्ट करणे हाच पर्याय उरला,” असे एका स्थानिक ग्राहकाने सांगितले.
मोबाईल कंपन्यांमधील स्पर्धा अधिक तीव्र! या घटनेनंतर मोबाईल सेवा कंपन्यांमधील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एअरटेलकडून यासाठी खास योजना जाहीर करण्यात येत असून, नवीन पोर्टिंग करणाऱ्यांना आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत.
टेलिकॉम विश्लेषकांचं मत: “हा आकडा छोट्या भागातही ग्राहक किती जागरूक आणि सजग झालेत हे दर्शवतो. आता कंपन्यांना गुणवत्ता आणि ग्राहक सेवा यावर अधिक भर द्यावा लागेल,” असं तज्ज्ञांचे मत आहे.