पुणे | पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पवर कारवाई केली होती. देशभरातून या शौर्याची प्रशंसा झाली असताना, पुण्यातील एका महिलेने या कारवाईची खिल्ली उडवणारे स्टेटस ठेवत देशविरोधी भावना व्यक्त केल्याने खळबळ माजली आहे.
फराह दिबा असे या महिलेला नाव असून त्या पेशाने शिक्षिका आहेत. त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर “जळत्या तिरंग्याचा फोटो” पोस्ट केला आणि ऑपरेशन सिंदूरचा उपहास करणारे वक्तव्य केलं. इतकंच नाही तर त्यांनी समाजमाध्यमांवर अनेक देशविरोधी संदेशही शेअर केल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना पुण्यातील मोहम्मद वाडी येथील मारगोसा हाइट्स सोसायटीतील असून, सोसायटीच्या ग्रुपवर ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरू असताना फराह दिबा यांनी हसण्याचा इमोजी टाकून भारतीय सैन्याचा अपमान केला. या प्रकाराने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करत या महिलेविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात ७ मे रोजी गुन्हा दाखल केला. बीएनएस कलम 152, 196, 197, 352 आणि 353 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
सदर प्रकार शिक्षिकेने केल्यामुळे अनेकांनी “अशा देशविरोधी विचारांची माणसं पिढ्यांना काय शिकवणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
🔸 देशासाठी शहीद झालेल्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे नागरिक म्हणाले असून, आरोपी महिलेला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.
संबंधित हेडलाईन्स:
‘ऑपरेशन सिंदूर’चा अपमान करणाऱ्या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल
जळत्या तिरंग्याचा फोटो व्हॉट्सअॅपवर टाकून देशद्रोह?
पुण्यात शिक्षिकेचा देशविरोधी स्टेटस, समाजात संतापाची लाट