सामाजिक

Home सामाजिक Page 62

“एचआयव्हीचा धोका! मुंबईत वेश्याव्यवसायात अडकलेल्या बांगलादेशी महिलांमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ”

0

मुंबई | दिनांक: २८ जून २०२५ :- मुंबई शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेश्याव्यवसायात जबरदस्तीने अडकवलेल्या ७ बांगलादेशी महिलांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्याने, आरोग्य व कायदा यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या छापेमारीत १४ महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यातील निम्म्याहून अधिक महिलांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. मानव तस्करीचा...

आई-वडिलांशी किरकोळ वाद… आणि थेट पुण्याला! पुणे पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे १६ वर्षीय मुलगी सुखरूप घरी परतली

0

पुणे :- हिंगोली जिल्ह्यातील एका लहानशा गावातून अचानक बेपत्ता झालेली १६ वर्षीय मुलगी पुण्यात सापडली. आई-वडिलांशी झालेल्या किरकोळ वादामुळे मानसिक तणावात आलेल्या या मुलीने कोणालाही न सांगता घर सोडले आणि पुणे गाठले. मात्र पुणे शहरातील पोलिसांच्या सजगतेमुळे आणि सहृदयतेमुळे ही मुलगी सुखरूप आपल्या कुटुंबाकडे परतली. पुण्यात पोहोचल्यावर ही मुलगी बुधवार पेठ परिसरात एकटीच फिरत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, चिंता आणि...

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल

0

पुणे : निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील  निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री...

गँगस्टर गजा मर्नेच्या ‘बिर्याणी स्वागत’ प्रकरणात पाच पोलिस निलंबित; पुणे पोलिसांचा मोठा कारवाईचा निर्णय,

0

पुणे :गुन्हेगारी जगतातील कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मर्ने याला कारागृहांतून दुसऱ्या ठिकाणी हलवताना बिर्याणी पुरवण्याच्या प्रकारावरून पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावले उचलत सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) आणि चार पोलिस शिपायांना निलंबित केले आहे. ही घटना ३ मार्च रोजी घडली होती, जेव्हा गजा मर्ने याला सुरक्षा कारणास्तव पुण्याच्या...

पिंपरी, १० मार्च २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ८० तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.

0

नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत...

पुण्यात मोठी कारवाई! बनावट जामीनदार आणि वकिलांचे रॅकेट उध्वस्त, पोलिसांचा मोठा डाव यशस्वी

0

🔹 गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचे रॅकेट सक्रिय 🔹 वानवडी पोलिसांची सापळा रचून कारवाई, ९ जणांना अटक 🔹 ९५ संशयित रेशनकार्ड, आधारकार्ड आणि मोठ्या प्रमाणात बनावट दस्तऐवज जप्त पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी जगतातील मोठा कट उध्वस्त करत वानवडी पोलिसांनी बनावट जामीनदारांचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. हे रॅकेट काही वकिलांच्या मदतीने गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करत होते....

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी; सकाळी मेल प्राप्त, सहा मजली इमारतीची सखोल तपासणी

0

हिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आज सकाळी सुमारे नऊ वाजता प्राप्त झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या गंभीर धमकीनंतर तात्काळ प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका टाळण्यासाठी दोन स्वतंत्र बॉम्बशोधक व नाशक पथकांद्वारे (BDDS) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची सखोल...

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला! मुंबई-नागपूर प्रवासाची नवी क्रांती, वेळ निम्मा होणार

0

मुंबई | प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक समृद्धी महामार्गाचे अखेरचे आणि सर्वात जास्त तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेले 76 किमीचे इगतपुरी ते अमाणे (ठाणे) हे अंतर आज, 5 जून 2025 रोजी औपचारिकरित्या वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटनामुळे 701 किलोमीटर लांब असलेला संपूर्ण मुंबई-नागपूर समृद्धी...

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋषभ दासचा ऐतिहासिक विक्रम! श्रीहरी नटराजचा विक्रम मोडत सुवर्णपदकाची कमाई

0

भुवनेश्वर | ७८ वी वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा २०२५ महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या ७८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या दिवशी, ऋषभ अनुपम दासने ऐतिहासिक विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. त्याने २ मिनिटे ०.६५ सेकंदांची जबरदस्त वेळ नोंदवत कर्नाटकच्या श्रीहरी नटराजचा स्पर्धा विक्रम मोडला. यामुळे त्याचे नाव भारतीय...

त्वष्टा कासार वाचनालय, कसबा पेठ, पुणे – माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” साजरा

0

पुणे : त्वष्टा कासार वाचन मंदिर, कसबा पेठ येथे आज माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान कसबा संस्कार वर्गाचे संचालक श्री. अनिल दिवाणजी व सौ. अनघा दिवाणजी उपस्थित राहून कलाम यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांचे स्मरण केले. कार्यक्रमात कसबा संस्कार वर्गातील ४० मुलांना पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले....

Copyright ©