निलंबन मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन! महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, सरकारला थेट इशारा
मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी हिवाळी अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे राज्यातील महसूल यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ४ तहसीलदार, ४ मंडल अधिकारी आणि २ तलाठी अशा एकूण १० अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, या निर्णयाविरोधात महसूल विभागातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. या निलंबनाच्या निषेधार्थ राज्यभरातील महसूल अधिकारी व...
पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! खराडीमधील ‘ड्रग्ज पार्टी’वर छापा – ७ जण ताब्यात, ४१ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
खराडी परिसरात एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध ड्रग्ज आणि हुक्का पार्टीवर पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच पुरुष व दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, कोकेन, गांजा, महागडे मोबाईल, हुक्का सेट, दारू व चारचाकी वाहने असा मिळून सुमारे ₹४१.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीवरून कारवाई दिनांक २७ जुलै २०२५...
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम आग्रह
मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी, अशी जोरदार मागणी ते सातत्याने करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता राहू नये, तसेच पूर्ण नियमितता आणि पारदर्शकता राखली जावी, हीच रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. बी डीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी...
पुण्यातील रस्त्यावर जीव धोक्यात घालून अश्लील चाळे; सार्वजनिक शिस्तीला सुरूंग!
पुणे – महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि निषेधार्ह घटना समोर आली आहे. शिंदेवाडी – खेड-शिवापूर मार्गावर एका धावत्या दुचाकीवर एका जोडप्याने अश्लील चाळ्यांचे प्रदर्शन करत संपूर्ण शहराची अब्रू झाकली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काय आहे नेमकी घटना? ▪️ व्हायरल व्हिडिओमध्ये...
आषाढी वारी २०२५ | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे औपचारिक निमंत्रण – शासकीय महापूजेसाठी तयारीला जोर
मुंबई | १७ जून २०२५ – भक्तिभावाने ओतप्रोत असलेल्या आषाढी वारीचा मुख्य सोहळा म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडते. यंदा ही महापूजा रविवार, ६ जुलै २०२५ रोजी पहाटे २.२० वाजता साकारणार असून, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होणार आहे. या शासकीय महापूजेचे औपचारिक निमंत्रण श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री...
डी. गुकेश यांनी डिंग लिरेनचा पराभव करत इतिहास घडवला; वयाच्या १८व्या वर्षी विश्व बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय.
नवी दिल्ली, १२ डिसेंबर २०२४: भारतीय बुद्धिबळपटू डी. गुकेश यांनी वयाच्या १८व्या वर्षी इतिहास घडवत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विश्व बुद्धिबळ विजेतेपद पटकावले. विश्वनाथन आनंद यांच्या २०१२ च्या विजयानंतर ही कामगिरी करणारा गुकेश हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला. विश्वनाथन आनंदनंतर गुकेशचे नाव सुवर्णाक्षरात: २०१३ मध्ये आनंद यांनी शेवटचे विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर प्रथमच एका भारतीयाने हे मानाचे विजेतेपद पटकावले आहे....
येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! आठ लाखांच्या कपड्यांची चोरी करणारा आरोपी जेरबंद, ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे | २६ एप्रिल २०२५ :- येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या अत्यंत कसोशीच्या आणि नियोजनबद्ध कारवाईतून कल्याणीनगर येथील जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून सुमारे आठ लाख रुपये किंमतीचे कपडे चोरणारा आरोपी गणपत डांगी याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. या कारवाईने परिसरात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. बातमीदाऱ्याच्या माहितीतून सापडला धागा दि. १९ एप्रिल २०२५ रोजी तपास पथकातील श्रेणी...
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये लवकरच पदभरती; मनुष्यबळाची कमतरता दूर होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
नागपूर : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये दीर्घकाळापासून जाणवत असलेली मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आकृतीबंधानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत केली. वित्त विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांतील मनुष्यबळाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना...
मतदान केंद्रांवर थेट पाहणी; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सुरक्षा व्यवस्थेवर कटाक्ष
पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत असून, मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार सो. यांनी स्वतः विविध मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततामय आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. पाहणीदरम्यान श्री. अमितेश कुमार यांनी बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी...
शिरूर तालुक्यात बिबट्याचा थरकाप; आईसमोर चिमुरडीवर हल्ला, दोन तासांनी आढळला मृतदेह.
शिरूर (पुणे): शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या रक्षानिकम या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना तिच्या आईच्या डोळ्यांसमोर घडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचा तपशील: रक्षा अजय निकम (वय ४) असे मृत मुलीचे नाव आहे. आई अंगणात आपल्या मुलाला खाऊ घालत असताना अचानक बिबट्याने संरक्षणासाठी उभ्या असलेल्या रक्षावर हल्ला केला. बिबट्याने चिमुकलीला...











