सामाजिक

Home सामाजिक Page 158

फरासखान्यातील धडक कारवाई — १.२७ कोटींचे एक किलो सोने चोरी करणारा कामगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात; राज्यभर पसरलेल्या शोधमोहीमेला यश

0

फरासखाना पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत धाडसी आणि गुंतागुंतीची कारवाई करत एक किलो शुद्ध सोने चोरी करणारा कामगार आणि त्याच्या साथीदार कारागीराला अटक करून १,२७,००,००० रुपये किंमतीचे संपूर्ण सोने हस्तगत केले आहे. या कारवाईने पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की आरोपी कितीही चलाख असला तरी कायद्याच्या हातातून सुटका अशक्य आहे. घडली होती थरारक चोरी — १० सोन्याच्या बिस्किटांचा...

शिवम एंटरप्रायजेसकडून नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार भरती; 8वी पासपासून पदवीधरांपर्यंत सुवर्णसंधी!

0

पुणे | प्रतिनिधी – कामाच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! शिवम एंटरप्रायजेस घेऊन येत आहे नामांकित कंपनीमध्ये थेट कामगार भरतीची सुवर्णसंधी. शिक्षण ८वी पासपासून ते पदवीधरांपर्यंत असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असून, आकर्षक पगार, ओव्हरटाईमची सुविधा, पी.एफ. व ईएसआयचा समावेश यामुळे ही नोकरी अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरणार आहे. भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती: शैक्षणिक पात्रता:8 वी, 9 वी, 10 वी,...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

0

पिंपरी, दि. १२ मार्च २०२५ – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक विकासाचे शिल्पकार होते, स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी सहकार, औद्योगिकरण, कृषी विकास आणि शिक्षण क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देऊन विकासाची पायाभरणी केली. त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा चालवत महाराष्ट्र विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार...

हामास प्रमुख इस्माईल हनियाह यांची इराणच्या राजधानीत हत्या, गटाने केली पुष्टी.

0

हामास प्रमुख इस्माईल हनियाह यांची काल तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी "धोकेबाज झायोनिस्ट हल्ल्यात" हत्या करण्यात आली. गटाने सांगितले की हल्ल्याबाबत अधिक तपशील शोधण्यासाठी तपास सुरू आहे. हमास प्रमुख इस्माईल हनियाह आणि त्यांचे एक अंगरक्षक इराणमध्ये त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यात ठार झाल्याचे आज हमासने आपल्या निवेदनात सांगितले आहे. हमासने म्हटले आहे की इस्माईल हनियाह यांना मंगळवारी सकाळी तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी "धोकेबाज झायोनिस्ट...

नागपूरमध्ये भक्तीमय वातावरण! देवेंद्रजींच्या पुढाकाराने भव्य रामनवमी उत्सवाचे आयोजन

0

नागपूर :- संपूर्ण देशभरात रामनवमीचा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असताना, नागपूरमध्ये देखील उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, या उत्सवाचे आयोजन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भव्य स्वरूपात करण्यात आले आहे.  श्रीरामाच्या भक्तीने भारलेले नागपूर! 🔹 शहरभर रामनामाचा गजर आणि जयघोषाच्या आवाजाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.🔹 विविध मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चा, महाआरती आणि धार्मिक प्रवचनांचे...

बालकिर्तनातून संतविचारांची उजळणी; चिखलीतील बालकिर्तन महोत्सव उत्साहात संपन्न

0

चिखली | प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील पहिले जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली येथे आयोजित बालकिर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाने केवळ धार्मिक परंपरेचा वारसा जपला नाही, तर नव्या पिढीला संतविचार, संस्कार आणि अध्यात्माशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या बालकिर्तन महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच संत परंपरा, अभंग, कीर्तनशास्त्र आणि समाजप्रबोधनाचे धडे इंग्रजी माध्यमातूनही दिले जात...

सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी

0

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी परस्पर समन्वय साधून सोहळा हा यशस्वी करावा. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ....

येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्तूलसह दोन गुन्हेगार जेरबंद

0

पुणे शहरातील येरवडा पोलिसांनी अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक करून एक पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख पेट्रोलिंग करत असताना त्यांना...

विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर बंदी; पुणे पोलीस आयुक्तालयाचा महत्वाचा आदेश | विमान सुरक्षेसाठी मोठा निर्णय

0

पुणे शहर पुणे विमानतळाजवळच्या परिसरातील कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईटवर ६० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे.हा निर्णय पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजन कुमार शर्मा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार घेतला असून, लोहगाव विमानतळाच्या १५ कि.मी. परिघात तो लागू राहणार आहे. का झाला निर्णय? भारतीय वायुसेनेने पुणे...

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या आयोजनाने पुण्याचे नाव जगभरात पोहोचले- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने पुण्याचे नाव जगात पोहोचले. प्रशासनाने गेले सहा महिने या स्पर्धेसाठी खूप मेहनत व तयारी केली, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रशासनाचे कौतुक केले. ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या अंतिम टप्प्यासह स्पर्धेच्या यशस्वी समारोप आज बालगंधर्व रंगमंदीर समोर झाला....

Copyright ©