पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटवर मोठी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ३ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी ब्लुमिंगडेल्स सोसायटी, ज्युपिटर हॉस्पिटल समोर, बाणेर, पुणे येथे कारवाई करण्यात आली. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – 1️⃣ रवि विजय वर्मा (वय १९, मूळ गाव – चित्रकुट, उत्तरप्रदेश, सध्या राहणार पिंपळे सौदागर, पुणे) 2️⃣ कौशलेंद्र नथुप्रसाद वर्मा (वय २३, मूळ गाव – चित्रकुट, उत्तरप्रदेश, सध्या राहणार पिंपळे सौदागर, पुणे) दोघेही इसम गांजा विक्रीसाठी घेऊन थांबले असताना पोलीसांनी सापळा रचून त्यांना पकडले.
गुन्हा दाखल या प्रकरणी गु.र.नं. १९३/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग श्री. विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अलका सरग, सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव, नंदकुमार कदम, अनिल माने, पोलीस उपनिरीक्षक संदेश माने, शैला पाथरे तसेच पोलीस कर्मचारी सपकाळ, गायकवाड, आहेर, शिंगे, इंगळे, गाडेकर, खरात, राऊत, भोरे, काळे, खुडे व पाथरुट यांनी ही कारवाई यशस्वीरित्या केली.
महत्त्वाचे पाऊल अंमली पदार्थ विक्रीवर पोलीसांकडून वेळोवेळी कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून तरुण पिढीला या व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी पोलीसांचे हे पाऊल कौतुकास्पद ठरले आहे.
🔹 बाणेर पोलिसांची धडक कारवाई – ३.४ किलो गांजासह दोन जण अटकेत 🔹 एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल – आरोपी उत्तरप्रदेशातील रहिवासी 🔹 अंमली पदार्थविरोधी मोहिमेत पुणे पोलिसांचे आणखी यश