महाराष्ट्र
फरासखाना पोलीस स्टेशनच्या पथकाची सलग चार दिवसांची मेहनत; शेवटी दोन्ही मुली सुखरूप सापडल्या
पुणे : फरासखाना पोलीस स्टेशनच्या दक्ष आणि तात्काळ कारवाईमुळे दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून, चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलींना शोधून काढले. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुकास्पद ठरली आहे. दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १९०/२०२५ भारतीय न्याय संहिता...
पुणे सीसीटीव्ही व्हिडिओ: भिगवणमध्ये कार शिकणाऱ्या व्यक्तीच्या गाडीखाली सापडून सायकल चालवणाऱ्या १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक घटनेत, पुण्याच्या भिगवण भागात सायकल चालवत असलेल्या १० वर्षांच्या मुलाला कार शिकणाऱ्या व्यक्तीने चिरडले. मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुषील शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत भिगवण परिसरात राहतात आणि ते चित्रकार म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा समर्थ भिगवणमधील आदर्श विद्या मंदिरात...
पुण्यात मोठी कारवाई; १६ बांग्लादेशी घुसखोरांना मायदेशी पाठविण्यात पुणे पोलिसांना यश
पुणे शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १६ जणांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये १५ महिला आणि १ पुरुषाचा समावेश असून, ही कारवाई मंगळवारी (दि. २२ जुलै) पार पडली. या कारवाईसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखा, गुन्हे शाखेच्या दोन पथकांसह पाच परिमंडळातील तपास पथकांनी समन्वयाने कार्यवाही केली. बुधवारी...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण; पुणेकरांच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचा आज भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते या अत्याधुनिक उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत...
सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई : सराईत घरफोड्या आरोपीला अटक, तब्बल ८ गुन्ह्यांची उकल
पुणे शहरात घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, सिंहगड रोड पोलिसांनी अचूक गुप्त तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. या अटकेमुळे तब्बल ८ वेगवेगळ्या घरफोडी गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांच्या या कामगिरीचे शहरभर कौतुक होत आहे. ही कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या नेतृत्वाखालील...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पिंपरी-चिंचवडकरांचा ठाम विश्वास – भाजपचा ऐतिहासिक विजय, ८४ जागांवर घवघवीत यश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत ८४ जागांवर विजय मिळवला आहे. या महाविजयातून पिंपरी-चिंचवडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. शहराच्या विकासासाठी स्थिर, सक्षम आणि पारदर्शक प्रशासनाची गरज ओळखून नागरिकांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचे या निकालातून दिसून येत आहे. या दणदणीत यशाबद्दल...
‘वर्षा’ निवासस्थानी शिवजन्मोत्सव विशेषांकाचे प्रकाशन; शिवकालीन वैभवाचा जागतिक गौरव
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ‘पुण्यनगरी’ लातूर आवृत्तीच्या ‘शिवजन्मोत्सव’ विशेषांकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमामुळे वातावरण शिवमय झाले होते. यावर्षीचा विशेषांक शिवकालीन पराक्रम आणि दुर्गवैभवावर आधारित असून, बारा ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या इतिहासाचा सखोल आढावा यात मांडण्यात आला...
“श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने “श्री मराठी हस्तलेखन समिक्षा” चे पारितोषिक वितरण संपन्न…
भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती "श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे" च्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे महत्व प्रगल्भित करण्याच्या हेतूने आयोजित केल्या गेलेल्या "मराठी हस्तलेखन समिक्षा" मध्ये सहभागी झालेल्या "ऑल इंडिया मुव्हमेंट फॉर सेवा" संस्था संचलित मु.पो. पांगरी, राजगुरुनगर येथील निराधार विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्धारित पारितोषिके प्रदान करण्यात आली. समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांना चित्रपटगृहात दाखविण्यात आलेल्या "हिंदवी...
समर्थ पोलिसांची दिवाळीपूर्व कामगिरी! घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद – सोन्याचे दागिने आणि रोकड हस्तगत
पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दक्षतेचा परिचय देत समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत सराईत चोरट्याला अटक करून चोरी गेलेला सोन्याचा व रोकडीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. ही घटना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता घडली. फिर्यादी दिवाळीच्या पूजेच्या तयारीसाठी घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : महिलांना राजकीय सत्तेत दुय्यम स्थान; उमेदवारीत केवळ ६% महिलांना संधी.
मुंबई : महिला केंद्रित मुद्द्यांवर निवडणूक प्रचाराची रणनिती आखणाऱ्या महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना राजकीय सत्तेत व उमेदवारीत मात्र दुय्यम स्थान दिले आहे. महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांनी महिलांना केवळ ६% उमेदवारी दिली असून, राजकीय नेतृत्वात महिलांची मागणी अजूनही दुर्लक्षित राहिली आहे. महिलांची तुटपुंजी राजकीय भूमिका निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ४,२३६ उमेदवारांमध्ये फक्त २३७ महिला उमेदवार...











