पुणे | मुंढवा :– सार्वजनिक ठिकाणी अनुशासनभंग करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंढवा पोलीस ठाण्याकडून जोरदार मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, ज्वालाग्राही पदार्थांचा वापर, आणि विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (पूर्व विभाग), पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ-५) आणि सहा. पोलीस आयुक्त अनुराधा उदमले (हडपसर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे, गुन्हे निरीक्षक बाबासाहेब निकम व त्यांच्या पथकाने सदर कारवाई केली.
लोकअदालतीत निकाल; आरोपींना दंड आणि कारावास
ही प्रकरणे वेळेवर न्यायालयात पाठवून, लष्कर न्यायालयात लोकअदालतीत सुनावणी घेण्यात आली. यामध्ये खुल्या ठिकाणी धोकादायक कृत्य करणाऱ्या आरोपींना दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे:
| अ.क्र. | गुन्हा नोंद क्रमांक / कलम | शिक्षा |
|---|---|---|
| 01 | 078/2025 BNS कलम 281 | ₹1100 दंड / न भरल्यास 1 दिवस साधा कारावास |
| 02 | 079/2025 BNS कलम 281 | ₹1100 दंड / न भरल्यास 1 दिवस साधा कारावास |
| 03 | 084/2025 BNS कलम 281 | ₹1100 दंड / न भरल्यास 1 दिवस साधा कारावास |
| 04 | 087/2025 BNS कलम 281 | ₹1100 दंड / न भरल्यास 1 दिवस साधा कारावास |
| 05 | 089/2025 BNS कलम 281 | ₹1100 दंड / न भरल्यास 1 दिवस साधा कारावास |
| 06 | 090/2025 BNS कलम 281 | ₹1100 दंड / न भरल्यास 1 दिवस साधा कारावास |




