Breaking News
पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये धडक कारवाई; ४.२७ कोटींचा एमडी जप्त, अंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेट उध्वस्त
पुणे : अंमली पदार्थविरोधी कारवाईत पुणे पोलिसांनी मोठे यश संपादन करत राजस्थानपर्यंत जाळे पसरलेल्या मेफेड्रॉन (एमडी) तस्करी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. ०३/०२/२०२६ रोजी...
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ ला प्रारंभ; अजितदादांच्या आर्थिक शिस्तीची आठवण, लोकहिताच्या निर्णयांची अपेक्षा
मुंबई | मंत्रालय दरवर्षी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar हे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असत. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणी, आकडेवारीवरील पकड आणि आर्थिक शिस्तीबाबतच्या ठाम भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा मिळाली. राज्याच्या आर्थिक शिस्तीची परंपरा अधिक बळकट करणाऱ्या त्यांच्या कार्याची आज विशेष आठवण होत आहे. आजपासून Maharashtra State Legislature चे ‘अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६’ औपचारिकपणे सुरू होत...
लोकसत्ता निवडणूक निकाल २०२४] नरेंद्र मोदी पुन्हा एनडीएचे नेते; नितीश, चंद्राबाबू यांचा देखील पाठिंबा; मित्रपक्षांचे समर्थन पत्र. जेडीयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चा समाप्त.
लोकसभा निवडणूक निकाल २०२४ मध्ये नरेंद्र मोदी एनडीएचे नेते म्हणून पुढे आले आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनीही मोदी यांना समर्थन दिले आहे. मित्रपक्षांकडून समर्थन पत्रे प्राप्त झाल्यानंतर जेडीयू आणि टीडीपीच्या भूमिकेवरील सर्व चर्चांचा शेवट झाला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा एनडीएचे नेते म्हणून निवडले गेले आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. मित्रपक्षांकडून...
मुंढवा पोलिसांचा कठोर दणका! हॉटेल लोकल बारमध्ये घडलेल्या हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल, हॉटेल सील
मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एबीसी रोडवरील हॉटेल लोकल बारमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या जबरदस्त हाणामारीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत गुन्हा दाखल केला असून, हॉटेल लोकल बार सील करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी रात्री उशिरा हॉटेल लोकल बारमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला. मोबाईलने व्हिडीओ शूट करण्याच्या...
पुण्यातून फरार झालेला विश्वासघातकी चालक अखेर गजाआड! सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे, ३० जुलै २०२५: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विश्वासघातकी चालकाने मालकाच्या कामासाठी आणलेली पगाराची रक्कम चोरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र, पोलिसांनी चाणाक्ष तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ठाणे) याला अखेर ठाण्यातून अटक केली आहे. काय घडलं होतं? फिर्यादीच्या गाडीतून मजुरांचा पगार देण्यासाठी १५ लाखांहून अधिक रोख रक्कम...
“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याचे!” – प्रभाग २५ (क) मधून अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी मैदानात; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह घेऊन त्या थेट मतदारांच्या दारात पोहोचत असून,“बटन घड्याळाचे – वेळ बदलण्याचे!”हा स्पष्ट आणि ठोस विकासाचा संदेश देत आहेत. मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६वेळ :...
कसबा विधानसभा मतदारसंघात विकासाला चालना! सातारवाडा-स्वारगेट रस्त्यासाठी DPR तयार, मुख्यमंत्र्यांकडे विविध प्रकल्पांची मांडणी
मुंबई/मंत्रालय :- कसबा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेले १४ महत्त्वाकांक्षी प्रकल्प सातत्याने पाठपुरावा करून पूर्णत्वाकडे नेले जात आहेत. यामध्ये सातारवाडा ते स्वारगेट आणि सरसबाग ते सातारवाडा या महत्त्वाच्या जमिनीवरील मार्गांचा समावेश आहे. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (DPR) तयारी आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे, ही या भागासाठी अत्यंत आश्वासक आणि सकारात्मक बाब आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज कुशल आणि दूरदृष्टी...
झोपेत असलेल्या मित्रांच्या घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला हडपसर पोलिसांची शिताफीने अटक!
पुणे – हडपसर परिसरातील मांजरी येथे उघड्या दरवाजाचा फायदा घेत तीन मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरुण चोरट्याला हडपसर पोलीसांनी अल्पावधीतच अटक केली आहे. ही घटना २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजता ते २३ एप्रिल सकाळी ६ वाजेच्या दरम्यान जाई रेसीडन्सी, मांजरी, पुणे येथे घडली. फिर्यादी आणि त्यांचे मित्र प्लॅटमध्ये दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपले होते. या संधीचा फायदा घेत...
लातूरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ६१ उमेदवारांसह मैदानात – सभेत ठाम निर्धार
लातूर ही धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारी मराठवाड्याची महत्त्वाची भूमी आहे. डाळी, तेलबिया आणि धान्य व्यापारामुळे लातूरची ओळख देशभरात एक सक्षम व्यापारी केंद्र म्हणून आहे. अशा या लातूर भूमीत ग्रामदैवत सिद्धेश्वर-रत्नेश्वर, हजरत सुरज शहा वली आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नमन करून लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्त आयोजित भव्य सभेत उपस्थितांना संबोधित करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी...
पंतप्रधान मोदी आज बिहारच्या राजगीरमध्ये नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करणार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील राजगीर येथील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. उद्घाटन समारंभाला १७ देशांच्या मिशनच्या प्रमुखांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. कॅम्पसमध्ये दोन शैक्षणिक ब्लॉक्स असून ४० वर्गखोल्या आहेत, ज्यामध्ये सुमारे १९०० विद्यार्थ्यांची आसनक्षमता आहे. कॅम्पसमध्ये प्रत्येकी ३०० आसनक्षमतेची दोन सभागृहे आहेत. कॅम्पसमध्ये सुमारे ५५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे विद्यार्थी वसतिगृह आहे. त्यात आंतरराष्ट्रीय केंद्र, २००० व्यक्तींना बसण्याची क्षमता...











