Breaking News
राज्यातील २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या – गृह विभागाचा मोठा निर्णय, सुरक्षा व्यवस्थेत नवीन घडी!
मुंबई | प्रतिनिधी: महाराष्ट्र गृह विभागाने गुरुवारी २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत राज्यातील पोलिस यंत्रणेमध्ये महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. या बदल्यांमुळे विविध जिल्ह्यांतील कायदा-सुव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता असून, नवीन अधिकाऱ्यांवर अनेक अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या बदल्यांची झलक: रायगड जिल्ह्यात आंचल दलाल यांची अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्या पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या पत्नी आहेत. पालघर जिल्ह्यात यतीश देशमुख यांनी...
दादर ते चर्चगेट लोकलमधून राज ठाकरेंचा प्रवास; विरोधी पक्षांच्या मोर्चाला मिळाला जनतेचा जबरदस्त प्रतिसाद!
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दादर ते चर्चगेट या मार्गावर लोकल ट्रेनने प्रवास करत विरोधी पक्षांच्या मोर्चात सहभाग नोंदवला. हा प्रवास प्रतीकात्मक असला तरी, त्याने मुंबईच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण केलं आहे. लोकलमध्ये राज ठाकरे यांना पाहण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. विरोधी पक्षांच्या एकत्र मोर्चाला आज विशेष महत्त्व मिळालं आहे. मनसे, शिवसेना (उद्धव ठाकरे...
पाकिस्तानी सेनाप्रमुख असीम मुनीरचा मुकेश अंबानीवर धमकी भरला बयब; भारतीय सुरक्षा तंत्र चिंतित.
बई/नई दिल्ली: पाकिस्तानच्या सेनाप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अलीकडे अमेरिकेच्या टॅम्पा, फ्लोरिडा येथे झालेया एका डिनरमध्ये भारताच्या प्रतिष्ठित उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर धमकी भरलेल्या टिप्पण्या केल्याचे समोर आले आहे. हा बयब भारतीय सुरक्षा संस्थांनी गंभीरपणे घेतला आहे. त्यांनी अंबानीच्या फोटोसह एक ट्वीट करून "सूरह फील" चा उल्लेख केला होता, ज्यात अल्लाच्या सर्वशक्तिमानतेचे वर्णन आहे आणि कोणत्याही शत्रूला मात देण्याच्या क्षमतेचा उल्लेख आहे. धमकीचा संदर्भ: मुनीरने पाकिस्तानी प्रवासी समुदायासमोर म्हटले, "एक ट्वीट...
औद्योगिक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘जीईसी’चे उद्घाटन होणार; भारत-आखात उद्योग संवादाला चालना
जगभरात शिक्षण व उद्योगाच्या क्षेत्रात आपल्या स्वतंत्र ओळखीने नावारूपास आलेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठ व सहाय्यक संस्थांच्या वतीने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी १६ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान दुबईतील हॉटेल कॉनरॉड येथे भव्य ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह (GEC) आयोजित करण्यात आले असून याचे उद्घाटन महाराष्ट्राचे औद्योगिक विकास मंत्री मा. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कॉन्क्लेव्हचे आयोजन पिंपरी...
कोंढवा पोलीस स्टेशनच्या युनिट-०५ पथकाने रेकॉर्डवरील आरोपीस गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूससह पकडले
पुणे | २६ एप्रिल २०२५ :- कोंढवा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या युनिट-०५ पथकाने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूससह एक गंभीर आरोपी जेरबंद केला आहे. दि. २४ एप्रिल २०२५ रोजी, गस्तीदरम्यान पोलीस अभिलेखावर असलेल्या आरोपी मौला ऊर्फ मौलाना रसुल शेख (वय २२ वर्षे, रा. माऊली कृपा बिल्डींग, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. गोपनीय माहितीवरून कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट-०५ च्या पोलीस स्टाफला गोपनीय...
शहरातील कुख्यात टोळीप्रमुख टिपू सतार टोळीचा पर्दाफाश, महिलांपासून वसुलीसाठी गंडवणुकीचा प्रयत्न, शेवटी पोलिसांची कारवाई
पुणे | दिनांक १७ जून २०२५ :- पुणे शहरातील हडपसर, सय्यदनगर आणि कालेबोळ परिसरात सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगारी टोळीचा मोठा भांडाफोड करण्यात आला आहे. टोळीचा प्रमुख रिझवान उर्फ "टिपू सतार पठाण" याने सात ते आठ जणांच्या साथीने पुण्यात गुन्हेगारीचे जाळे पसरवले होते. नागरिकांवर दबाव टाकून जमिनी, मालमत्ता, वसुलीचे प्रकार घडवले जात होते. या टोळीने एका महिलेकडून २० लाखांची मागणी...
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ साठी अधिकाऱ्यांचे मास्टर प्रशिक्षण यशस्वी
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला मास्टर प्रशिक्षण कार्यक्रम (प्रशिक्षकांचे प्रशिक्षण – ToT) यशस्वीरित्या पार पडला. भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्ष सभागृह येथे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री....
“बेरजेचे राजकारण हेच यशवंतराव चव्हाण यांचे खरे नेतृत्व” – मोहन जोशी
पुणे, दि. १२ मार्च २०२५ - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. आ. मोहन जोशी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 'बेरजेचे राजकारण' ही खरी प्रेरणा...
वारजे पुलावर एलपीजी टँकर उलटला; मोठा अनर्थ टळला, वाहतुकीत अडथळा.
वारजे पुलाजवळ एलपीजी टँकरचा अपघात; प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा धोका टळला आज सकाळी ७:३० वाजता वारजे पुलावर मुंबई-पुणे महामार्गावर कटराजकडे जाणाऱ्या लेनवर एलपीजी गॅसने भरलेला टँकर उलटला. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. अपघातस्थळी तात्काळ मदतकार्य सुरू अग्निशमन दलाचे जवान आणि दोन क्रेनच्या सहाय्याने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr PI) आणि...
करसंकलन विभागाकडून शनिवारी करसंवादाचे आयोजन
पिंपरी, दि. ३० जानेवारी २०२५ :- करदात्यांच्या शंकाचे निरसनासाठी करसंकलन विभागाने करसंवाद उपक्रम सुरू केला. नागरिकांच्या मालमत्ताकराबाबतच्या शंका, प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी शनिवार, दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी, 11.30 वाजता करसंवादाचे ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात आयोजन केले असून नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन प्रतिसाद द्यावा. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये थेटसंवाद असा उद्देश असलेल्या करसंवादामध्ये नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाकडून तत्काळ माहिती पुरविण्यात येईल....











