Breaking News
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 91 वी स्थानबध्दतेची कोंढवा परिसरात अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई!
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारुची विक्री करुन दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार भिमय्या लिंगय्या भंडारी (वय- 23 रा. कानडेनगर, उंड्री, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 91 वी कारवाई आहे. भिमय्या भंडारी हा कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारुचा...
इको पॉइंटच्या खोल दरीत अडकलेला कुत्रा तब्बल दोन दिवसांनंतर सुखरूप बाहेर – ‘सह्याद्री मित्र आपत्कालीन पथकाची’ शौर्यगाथा!
माथेरान | निसर्गरम्य माथेरानमधील प्रसिद्ध इको पॉइंटजवळील लँडस्केप पॉइंटच्या 150 ते 200 फूट खोल दरीत अडकलेल्या एका भटक्या कुत्र्याला तब्बल दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर सोमवारी संध्याकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही अत्यंत धाडसी व संवेदनशील मोहिम ‘सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संघटनेच्या’ बचाव पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली. कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सह्याद्री मित्र संघटनेच्या स्वयंसेवकांनी सहनशीलता, धाडस आणि संयम यांचे...
एकता नगरातील मुख्य गटार लाईनची तातडीने साफसफाई; नागरिकांना दिलासा
एकता नगर परिसरातील मुख्य गटार लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात माती, कचरा आणि दगड साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडथळित झाला होता. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा मंदावून काही ठिकाणी दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर तत्काळ संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्यात आला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून विशेष यंत्रसामग्रीच्या साहाय्याने गटार लाईनमधील साचलेला गाळ, कचरा व दगड काढून टाकले....
नीरज चोप्रा डायमंड लीग फायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर, ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने प्रथम स्थान पटकावले.
भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने 2024 डायमंड लीग फायनलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. ब्रसेल्स येथील किंग बौडौइन स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 87.87 मीटरच्या सर्वोत्तम भालाफेकीसह प्रथम स्थान मिळवले, तर नीरजची सर्वोत्तम फेक 87.86 मीटरवर राहिली, जी अवघ्या 1 सेंटीमीटरने कमी होती. या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर जर्मनीच्या जुलियन वेबरने 85.97 मीटरची फेक करत बाजी मारली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या...
लोणी काळभोर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी: एम.पी.डी.ए.तील फरार आरोपीला जेरबंद करून स्थानबद्ध
लोणी काळभोर पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि कायद्यावरील दृढ पकड सिद्ध केली आहे. पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एम.पी.डी.ए. प्रकरणातील फरार आरोपी शुभम संजय धुमाळ (वय २३) याला जेरबंद करण्यात आले आहे. धुमाळ हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, जबरी चोरी, दुखापत अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जुलै २०२४ मध्ये...
“शौर्यस्थळांचा आदर, आणि तीर्थस्थळांचा वारसा जपणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!” — आलंदी येथे 450 एकर जागेत भव्य ज्ञानपीठ उभारण्याची घोषणा
पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत, आलंदी येथे 450 एकर जागेवर भव्य ‘ज्ञानपीठ’ उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संत परंपरेचा गौरव वाढविण्यासाठी आणि भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून ही ऐतिहासिक योजना राबविली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, “माउलींची परंपरा ही केवळ अध्यात्माची नाही तर समाजजागृतीची आहे. म्हणूनच या पवित्र...
पुण्यात थंडीला तात्पुरता दिलासा; १९ डिसेंबरपासून पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता
पुणे | गेल्या आठवडाभरापासून तीव्र थंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना बुधवारी रात्री तात्पुरता दिलासा मिळाला. शहरात किमान तापमान दुहेरी अंकात नोंदवले गेले असून, शिवाजीनगर येथे किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते हा दिलासा अल्पकालीन असून १९ डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही थंडी २०२५ वर्षाच्या अखेरपर्यंत टिकून राहण्याची चिन्हे आहेत. सध्या पुणे...
“मिशन परिवर्तन” उपक्रमाने बालकांना दिला स्वावलंबनाचा नवा मार्ग
पुणे, दि. २५: पुणे पोलिस आयुक्तालयाच्या "मिशन परिवर्तन - नवी दिशा, नवा प्रवास" या विशेष उपक्रमाच्या अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात आठ विधी संघर्षग्रस्त बालकांना स्वावलंबनाचा नवीन मार्ग दाखवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत बालकांना जूट बॅग निर्मितीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान बालकांनी आपल्या हाताने जूट बॅग तयार करत उत्कृष्ट कौशल्य दाखवले आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संकल्प केला. उपक्रमाचे...
रोह्यात ‘सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी’चे लोकार्पण; तरुणांना करिअरच्या नव्या संधी
Roha येथे तरुणांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या संधी वाढविण्याच्या उद्देशाने ‘सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी’ तसेच IESP Institute चा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोहा, द युनिक अकॅडमी आणि आय.ई.एस.पी. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार Sunil Tatkare यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या...
हिंजवडी वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास; PMRDA कडून १६६ अतिक्रमणांवर कारवाई!
पुणे (हिंजवडी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)ने हिंजवडी आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीला प्रतिबंध घालण्यासाठी पीएमआरडीएने सखोल पावले उचलत, गेल्या १५ दिवसांत तब्बल १६६ अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्थेला दिलासा दिला आहे. हिंजवडी हा पुण्याचा प्रमुख आयटी हब असल्यामुळे येथे दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं आणि होर्डिंग्जमुळे प्रचंड...













