Home Breaking News पुण्यातील भूगाव भुकूम परिसरात पीएमआरडीएची अनधिकृत हॉटेल बांधकामांवर कारवाई

पुण्यातील भूगाव भुकूम परिसरात पीएमआरडीएची अनधिकृत हॉटेल बांधकामांवर कारवाई

पीएमआरडीएने पुण्यातील भूगाव, भुकूम परिसरातील अनधिकृत हॉटेलच्या बांधकामावर कारवाई केली

छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या परिसरातील हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएने सलग दोन दिवस कारवाई करून ती पाडली.

या कारवाईत ठिकाणा, JZ, सरोवर, थालासो, रॉयल लेक, CO2, OH इत्यादी हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश होता.

एकूण ३१,२०४ चौरस फूट अनधिकृत हॉटेल, पब, रेस्टॉरंट आणि बारची बांधकामे पोकलन, जेसीबी आणि मनुष्यबळाचा वापर करून पाडण्यात आली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) पुणे हद्दीतील सर्व उर्वरित पब, बार आणि रेस्टॉरंटचे सर्वेक्षण करत आहे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहील, असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.