गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 18

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला लुटणारा दुचाकीस्वार १२ तासांत गजाआड! पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे गुन्हेगार सापडला

0

धनकवडी परिसरात मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका महिलेला लुटून पसार झालेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करत मोठं यश मिळवलं आहे. या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या जलद आणि अचूक तपासामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दि. १६ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे सातच्या सुमारास फिर्यादी महिला सिध्दीविनायक मंदिराजवळील हिलटॉप सोसायटीच्या...

कुख्यात गुंड सोन्या घायाळ आणि साथीदारांच्या मुसक्या आवळल्या; लोणी काळभोर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

0

लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने मोकोका गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात आले असून, ही कामगिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमता आणि चिकाटीचे प्रतीक ठरली आहे. कुख्यात गुंड सोन्या ऊर्फ निखील घायाळ आणि त्याच्या टोळीने केलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी अथक प्रयत्नांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून नागरिकांना दिलासा दिला आहे. दि. २३ डिसेंबर २०२४: कुख्यात...

सिंहगड रोडवरील ‘वि मार्ट’ परिसरात दहशतीचा अतिरेक; मोटारसायकलवर आलेल्या सहा दरोडेखोरांकडून धारदार शस्त्रांनी हल्ला, अनेक गाड्यांचे नुकसान!

0

पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास मोहीते पॅराडाईज, मॅकडोनाल्ड जवळील 'अनलिमीटेड (वि मार्ट)' शोरूम परिसरात मोठा गोंधळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सहा अज्ञात इसम धारदार हत्यारांसह मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी शोरूमच्या काचेच्या दरवाज्यावर हल्ला केला, तसेच परिसरातील १५ ते २० चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव...

वादग्रस्त प्रकरण! पोलीस अधिकाऱ्याची हप्ता वसुली? – ₹८०० च्या चष्म्यासाठी पैसे न देता दुकानातून निघाले अधिकारी!

0

एका पोलीस अधिकाऱ्याने एका छोट्याशा दुकानातून चष्म्याच्या काचा बदलून घेतल्या, ज्याची किंमत अवघी ₹८०० होती. मात्र, दुकानदाराने कितीही विनंती केली तरीही अधिकाऱ्याने पैसे दिले नाहीत, असा आरोप थेट दुकान मालकाने केला आहे. हक्काने सेवा घेतली, पण पैसे मात्र नाहीत! दुकानदाराने सांगितले की, संबंधित पोलीस अधिकारी वर्दीमध्ये आले होते, त्यांनी चष्मा निवडला, बदलून घेण्यास सांगितले, आणि नंतर पैसे न देता “बघू नंतर…”...

स्वारगेटमध्ये महिला चोरट्या जेरबंद – ₹२.७० लाखांचे दागिने जप्त; ३ गुन्ह्यांचा उलगडा!

0

पुणे – पुणे शहराच्या मध्यवर्ती स्वारगेट परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत महिला चोरट्याला अखेर स्वारगेट पोलिसांनी तडाख्यात घेतले आहे. पोलिसांनी तिला गुप्त माहितीच्या आधारे रंगेहाथ पकडले असून तिच्याकडून तब्बल ₹२,७०,००० किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईतून स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. स्वारगेट परिसरातील एसटी स्टॅंड आणि...

अनैसर्गिक संबंधावरून वाद, रक्तरंजित खून… २४ तासांत आरोपी जेरबंद! विश्रामबाग पोलिसांची गून्हे उघडकीस आणण्यात विलक्षण कामगिरी

0

पुणे | ६ जून २०२५ – पुणे शहरात पुन्हा एकदा अनैसर्गिक संबंधावरून निर्माण झालेल्या वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंडई मेट्रो स्टेशनसमोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत अवघ्या २४ तासांत आरोपी रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. कातरड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याला अटक करून गुन्हा...

खराडी पोलिसांची जलद कारवाई – अवघ्या २४ तासांत घरफोडी प्रकरणाचा छडा, आरोपी महिला मुद्देमालासह जेरबंद!

0

पुणे शहरातील खराडी परिसरात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिसांनी अतिशय जलदगतीने उकलत अवघ्या २४ तासांत आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलिसांच्या या जलद व प्रभावी तपासामुळे चोरी गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम परत मिळाली असून, रहिवाशांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधानाचे वातावरण आहे. खराडी परिसरातील एका गृहनिर्माण संकुलात राहणाऱ्या फिर्यादी महिलेने मेहनतीने जमवलेले सोन्याचे दागिने (सुमारे अडीच तोळे) आणि ३० हजार...

बोपोडीतील चाळीत मध्यरात्री थरार! | महिलेला धमकी, पतीवर जीवघेणा हल्ला | खडकी पोलिसांकडून तपास सुरू

0

पुणे (बोपोडी): बोपोडीतील रेल्वे पटरीजवळ असलेल्या कमलाबाई बहिरट चाळीत दि. २५ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ४५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने तिच्या पतीवर थेट जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटना रात्री २३.२० वाजता घडली. फिर्यादी महिला आपल्या राहत्या घरी असताना सदर इसमाने त्यांच्या...

संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सोनं आणि मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद – २३.९१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

0

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२५ दरम्यान, दर्शनासाठी जमलेल्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ०५ व ०६ ने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाचे कौशल्यपूर्ण तपासकार्य गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तयार नियोजन, सतर्क पेट्रोलिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे एकूण ८ आरोपी व १...

आझाद चौकात भीषण आग; १० हून अधिक दुकानं खाक, लाखोंचं नुकसान

0

छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौक परिसरात रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १० हून अधिक दुकानं जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीनं व्यापारी वर्ग हतबल रात्री उशिरा आझाद चौक परिसरात अचानक धुराचे लोट दिसू लागले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. दुकानांमध्ये असलेला कापड, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आणि...

Copyright ©