0
0
0
0
0

पुणे

Home पुणे Page 99

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा – कुणाल कामराच्या बँक खात्याची चौकशी होणार!

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक टिप्पणीवरून मोठा गदारोळ उठला आहे. या प्रकरणी कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले आहे. कामराच्या संपत्तीचा शोध – किती आहे नेटवर्थ? मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल कामरा हा कोट्यधीश असून, स्टँडअप कॉमेडी, यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी...

महिनाभराच्या शोध मोहिमेनंतर फरार प्रशांत कोरटकर अखेर अटकेत – पोलिसांची मोठी कारवाई!

फरारी कोरटकर अखेर जेरबंद – पोलिसांनी घेतली मोठी भूमिका! छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमक्या देणारा फरार प्रशांत कोरटकर अखेर अटकेत आला आहे. महिनाभर सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर तेलंगणामध्ये पोलिसांनी त्याला पकडले असून, लवकरच कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेणार आहेत. कसा पकडला गेला कोरटकर? – मोठी पोलिस मोहीम! प्रशांत कोरटकरने वादग्रस्त विधाने...

पुण्यात ‘बारक्या टोळी’चा पर्दाफाश – घरफोडी व वाहनचोरी करणारे पाच जण जेरबंद!

पुण्यात घरफोडी आणि वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने मोठी कारवाई करत कुख्यात 'बारक्या टोळी'चा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर अनेक घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी योजनाबद्ध कारवाई करत या टोळीचा बंदोबस्त केला. पो. हवा. नितीन मुंडे...

शरद पवारांवर टीका केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला ४० दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा! राजकीय वर्तुळात खळबळ

मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याने तिला ४० दिवस तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विवादित पोस्टमुळे अडचणीत केतकी चितळे केतकी चितळे हिने काही महिन्यांपूर्वी आपल्या सोशल मीडियावर शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान पोस्ट केली होती. या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

वाघोली पोलीस ठाण्याची कठोर कारवाई – सराईत गुन्हेगार टोळीवर तडीपारीची कारवाई!

वाघोली, पुणे – वाघोली पोलीस ठाणे आणि पुणे शहर पोलीस दलाने स्थानिक रहिवाशांना त्रास देणाऱ्या, परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि कायद्याची धज्जी उडवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करत त्यांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. गुन्हेगारीला थांबवण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज मोहीम सुरू असून, यामुळे वाघोली परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार – गुन्हेगारीला पूर्णविराम! वाघोली पोलीस ठाण्याच्या...

परराज्यातून येऊन पुण्यात गांजाची विक्री करणारा इसम जेरबंद – पोलीस तपास सुरू

पुणे – पुणे शहरात अंमली पदार्थ विक्रीस आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सतत कडक कारवाई केली जात असून, अशाच एका मोठ्या कारवाईत परराज्यातून आलेल्या इसमाला गांजाची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. स्वारगेट परिसरात हॅण्डल्युम हाऊस शॉपसमोर सार्वजनिक रस्त्यावर कारमध्ये संशयास्पदरीत्या बसलेल्या इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. झडती घेतली असता तब्बल ६० किलो ०६७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात...

आर्थिक वर्षाअखेर तीन दिवस मिळकतकर भरण्यासाठी कॅश काउंटर कालावधीत वाढ….३१ मार्च पर्यंत रात्री १२ पर्यत कर भरण्याची सुविधा.

पिंपरी : आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना करदात्यांना आपला कर भरण्यास सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने करसंकलन कार्यालये व कॅश काऊंटर्स २९ मार्चपर्यंत सकाळी ९.४५ ते रात्री ०९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत असे करसंकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शनिवार २९ मार्च, रविवार ३० मार्च, गुढीपाडव्याच्या दिवशी व ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटच्या दिवशी...

एअर इंडियाच्या विमानांमधील उशिरामुळे प्रवाशांमध्ये मोठा संताप! मंत्रालयाकडे थेट उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी

एअर इंडियाच्या विमानांच्या उशिरामुळे प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. प्रीमियम शुल्क भरणार्‍या प्रवाशांना तिकीटाच्या किंमतीबद्दल अपेक्षित सेवांचा अभाव दिसून येत असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी या कुप्रबंधनाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी मंत्रालयाकडे थेट उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली आहे आणि या समस्येची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवासातील अडचणी आणि व्यावसायिकांवरील परिणाम: विमानांच्या उशिरामुळे व्यावसायिक प्रवाशांमध्ये...

खराडी पोलिसांची जलद कारवाई – अवघ्या २४ तासांत घरफोडी प्रकरणाचा छडा, आरोपी महिला मुद्देमालासह जेरबंद!

पुणे शहरातील खराडी परिसरात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिसांनी अतिशय जलदगतीने उकलत अवघ्या २४ तासांत आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलिसांच्या या जलद व प्रभावी तपासामुळे चोरी गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम परत मिळाली असून, रहिवाशांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधानाचे वातावरण आहे. खराडी परिसरातील एका गृहनिर्माण संकुलात राहणाऱ्या फिर्यादी महिलेने मेहनतीने जमवलेले सोन्याचे दागिने (सुमारे अडीच तोळे) आणि ३० हजार...

सांगवीतील बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी

पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. सांगवी येथील मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय २१) या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला. नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल? मानसी हिची काही महिन्यांपूर्वी पोटाची शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे ती परीक्षेला बसू शकली नाही. या गोष्टीमुळे ती मानसिक तणावाखाली होती. परीक्षेचे नुकसान झाल्याने...

Copyright ©