पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १२०व्या भागात देशवासीयांना संबोधित करताना कापड कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर गांभीर्याने भाष्य केले. जलद फॅशनमुळे मोठ्या प्रमाणावर वस्त्र अपव्यय होत आहे आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. भारत कापड पुनर्वापर आणि शाश्वत फॅशनच्या माध्यमातून या समस्येला प्रभावीपणे सामोरे जात आहे, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
Video Player
00:00
00:00