फुरसुंगी हत्या प्रकरणातील आरोपी लातूरमधून जेरबंद — गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी यशस्वी कामगिरी!
फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पुणे शहर हादरले होते. मृताच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्याचे आढळून आले होते. ही घटना अत्यंत निर्घृण स्वरूपाची असून पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला. मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून मृताचे नाव हनिफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे) असे आहे. १० मे २०२५ रोजी...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मराठी चित्रपट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला मराठी चित्रपट महोत्सव…
‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या बहूउद्देशीय संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगृहात चित्रपट संकल्पने अंतर्गत मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. २४ मार्च ते २५ मार्च २०२५ याकाळात पिंपरी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे पोस्टर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे...
झोपेत असलेल्या मित्रांच्या घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला हडपसर पोलिसांची शिताफीने अटक!
पुणे – हडपसर परिसरातील मांजरी येथे उघड्या दरवाजाचा फायदा घेत तीन मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरुण चोरट्याला हडपसर पोलीसांनी अल्पावधीतच अटक केली आहे. ही घटना २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजता ते २३ एप्रिल सकाळी ६ वाजेच्या दरम्यान जाई रेसीडन्सी, मांजरी, पुणे येथे घडली. फिर्यादी आणि त्यांचे मित्र प्लॅटमध्ये दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपले होते. या संधीचा फायदा घेत...
चाकण रस्त्यांची दुर्दशा गंभीर! नागरिकांचा संताप; सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी
चाकण | २५ जुलै २०२५ – चाकण परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. उखडलेले रस्ते, खड्ड्यांनी भरलेले मार्ग, वाहतूककोंडी आणि धुळीचे साम्राज्य यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रोज शेकडो ॲम्ब्युलन्स या मार्गांवरून धावतात, त्यामुळे आपत्कालीन रुग्णवाहू सेवाही धोक्यात आली आहे. नागरिक आणि रुग्णांचे हाल सुरूच! रोजच्या दैनंदिन वाहतुकीसह, आपत्कालीन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सही या...
पुणे पोलीस सज्ज: ऐतिहासिक श्री गणेशोत्सव २०२५ सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
पुणे – पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मकतेचा महामेळावा. जगभरात कीर्ती पावलेला पुण्याचा "श्री गणेशोत्सव" यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान साजरा होणार असून, त्याची सांगता ६ व ७ सप्टेंबर रोजीच्या भव्य मिरवणुकांनी होणार आहे. पुण्यात यंदा तब्बल ३,९५९ सार्वजनिक गणेश मंडळे आणि ७४,५९४ खाजगी गणेश मंडळे नोंदणीकृत असून, लाखो भाविक पुण्यासह...
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात टळला; झाड कोसळले तरी उद्योजक बचावले!
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत हॉटेलसमोर एक धक्कादायक प्रकार घडला. आज मंगळवारी (ता. २२ जुलै) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास, रस्त्यालगत लावलेल्या एका चारचाकी वाहनावर अचानक झाड कोसळले. ही चारचाकी आळंदी म्हातोबा येथील युवा उद्योजक केतन मच्छिंद्र जवळकर यांची असल्याची माहिती मिळाली आहे. वाहन पार्क करत असतानाच अचानक गुलमोहराचे एक प्रचंड झाड त्यांच्या गाडीवर कोसळले....
हिंजवडी आयटी पार्क व पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या विकास कामांना गती! स्थानिक समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश
पुणे | पुण्यातील माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र समजल्या जाणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी आयटी पार्क' परिसरात उद्भवणाऱ्या स्थानिक समस्या आणि प्रलंबित विकासकामांची आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर पाहणी केली. यावेळी पुणे मेट्रो मार्गिका - ३ अंतर्गत असलेल्या विविध स्थानकांची प्रत्यक्ष भेट घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. पाहणी दरम्यान घेतलेल्या ठिकाणांचा आढावा: स्थानक क्र. ०६ - क्रोमा (हिंजवडी फेज ३) स्थानक क्र. ०३...
कात्रज परिसरात १७ एप्रिलला पाणीपुरवठा बंद; महत्त्वाच्या पाईपलाइनच्या दुरुस्तीमुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा – पुणे मनपाचा इशारा
पुणे : पुणे शहरातील कात्रज आणि परिसरातील नागरिकांना १७ एप्रिल रोजी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. पुणे महापालिकेच्या जलविभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगम मंदिराजवळील मोठ्या दाबाच्या पाईपलाइनमध्ये गळती आढळल्यामुळे त्या ठिकाणी अत्यावश्यक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याचबरोबर राजमाता सबवेच्या परिसरातही संरचनात्मक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होणार आहे. महापालिकेच्या जलविभागाने सांगितले की, १८ एप्रिल रोजी...
निगडीत रिक्षा पलटीचा अपघात : मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले मदतीला धावले; माणुसकीचा मोठा संदेश
निगडी परिसरातील पुणे गेट हॉटेल समोर घडलेल्या अपघातात एका रिक्षाचा अचानक पलटी होऊन मोठी दुर्घटना टळली. या अपघातात एक महिला आणि रिक्षाचालक अडकले असताना, नशिबाने त्या मार्गावरून जात असलेले मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ मदतीचा हात दिला. सचिन चिखले हे कामानिमित्त देहूकडे जात होते. त्यावेळी रस्त्यावर एक रिक्षा (MH-14 KU-7411) उलटलेली दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता...
नितीन गडकरी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’; पुण्यात भव्य सोहळा
पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यात भरलेल्या या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, तसेच रोहित टिळक व इतर मान्यवर उपस्थित होते. गडकरी यांनी सांगितले की, “हा पुरस्कार केवळ गौरव नाही तर जबाबदारीही आहे. स्वराज्याच्या विचारातून सुराज्याच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा या...
















