पोलिस आयुक्तांचे नाव घेऊन खंडणी मागणाऱ्यांचा भंडाफोड – पत्रकार जितीन शेट्टीसह अन्य आरोपी रंगेहाथ अटक
पुणे : शहरातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे धाडस काही पत्रकारांनीच केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिस आयुक्तांचे नाव वापरून दबाव टाकत लाखो रुपयांची मागणी करणाऱ्या जितीन शेट्टीसह अन्य पत्रकारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर व्यावसायिक समाजात दिलासा तर माध्यम क्षेत्रात धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पत्रकारांनी व्यावसायिकांना “पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करणार आहेत, पण आमच्याशी सेटलमेंट केल्यास प्रश्न सुटेल”...
पुण्यात धडक कारवाई! पिस्तूल व काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद – गुन्हे शाखा युनिट २ चा अचूक सापळा
पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अंमली माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एक रेकार्डवरील सराईत गुन्हेगार जिवंत काडतुसासह पिस्तूल घेऊन फिरताना तळजाई वसाहत, सहकारनगर येथे रंगेहाथ पकडण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीकडून ४०,४०० रुपये किंमतीचे पिस्टल व मॅगझिनसह जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच मोठा अनर्थ टळला आहे. ही कारवाई १५ जुलै...
पुण्यात बनावट आर्मी ऑफिसर पकडला! – अभिषेक भोसलेची लष्करी वेशात फसवणूक; लष्कर व पोलिसांची संयुक्त कारवाई
पुणे : लष्करी अधिकाऱ्याची बनवाबनवी करत पुण्यातील कॅन्टोन्मेंट परिसरात सळसळत फिरणाऱ्या एका तरुणाला लष्कर व पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. सदर तरुण लष्करी गणवेशात वावरत असतानाच तांत्रिक माहितीच्या आधारे त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे - अभिषेक शिवाजी भोसले अटकेची कारवाई : ही कारवाई पुण्याच्या बिशप स्कूलजवळ दुपारी २ वाजता करण्यात आली. साऊथर्न...
“सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पिंपरी-चिंचवड विकास आराखडा (DP) तात्काळ रद्द करावा” आमदार अमित गोरखे यांची लक्षवेधीद्वारे विधान परिषदेत ठाम मागणी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या विकास आराखड्याबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी असून, हा आराखडा पूर्णतः बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार अमित गोरखे यांनी आज विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेद्वारे केला. आमदार गोरखे यांनी हा विकास आराखडा तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी करताना, हा आराखडा म्हणजे "जनतेच्या विरोधात आखलेला योजनाबद्ध कट" असल्याचे तीव्र शब्दांत विधान परिषदेत स्पष्ट केले. याचसोबत, संबंधित...
“जग भारतावर विश्वास ठेवते” – सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत जागतिक भागीदारीसाठी सज्ज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी सांगितले, “जग भारतावर विश्वास ठेवते. जग भारतासोबत सेमीकंडक्टर भविष्य घडविण्यासाठी तयार आहे.” आजच्या डिजिटल युगात सेमीकंडक्टर उद्योग हा जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मोबाईल, संगणक, ऑटोमोबाईल, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि संरक्षण क्षेत्रात सेमीकंडक्टरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर भारताने केलेली झेप ही केवळ तांत्रिक...
कोंधव्यात मध्यरात्री तरुणावर प्राणघातक हल्ला; ९ आरोपी अटकेत, पोलिसांकडून तपास सुरू
पुणे, १२ जुलै २०२५ | कोंधवा:- पुण्यातील कोंधवा परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडवली आहे. गोळकुलनगर येथे रात्री १० वाजता २५ वर्षीय तरुणावर ओळखीच्या व्यक्तींनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक...
२०५० पर्यंत १,२५७ MLD पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सिडकोकडून नवी मुंबईत भव्य जलसंपदा प्रकल्प!
नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला आणि औद्योगिक-वसाहती विकासाला आवश्यक असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सिडको (CIDCO) ने मोठ्या प्रमाणात जलसंपदा पायाभूत प्रकल्प हाती घेतले आहेत. २०५० पर्यंत नवी मुंबईला १,२५७ दशलक्ष लिटर दररोज (MLD) पाण्याची गरज भासणार आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोची अनेक महत्त्वाची कामे वेगात सुरू आहेत. 🔹 Hetawane पाणीपुरवठा योजनेचा विस्तार सध्या हेटवणे पाणीपुरवठा योजना चार टप्प्यांमध्ये राबविली जात...
“कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी शेखर सिंह यांना पिंपरी-चिंचवडकरांचा नागरी सत्कार – शहराच्या विकासासाठी दिलेलं योगदान अविस्मरणीय!”
पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन आणि विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. श्री. शेखरजी सिंह यांचा ‘‘नागरी सत्कार सोहळा’’ चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. शहराच्या सर्वच घटकांचा सहभाग असलेल्या या सोहळ्यात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, अधिकारी आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन शहराच्या प्रगतीसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शेखर सिंह यांचा सन्मान केला. या...
विमानतळ पोलिसांची चतुर कारवाई: सराईत गुन्हेगाराला अटक; दोन चोरीच्या दुचाकी जप्त
पुणे :- विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सक्रिय असलेल्या पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पाडत सराईत दुचाकी चोरट्याला रंगेहात अटक केली आहे. या अटकेमुळे दोन विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या दुचाकींचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक ५ मे २०२५ रोजी विमानतळ पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम लोहगाव येथून दुचाकी चोरून सध्या...
ऐतिहासिक निर्णयाने ठाकर वाडीत आनंदाचा शिडकावा; पाच पिढ्यांच्या संघर्षाला मिळाला कायदेशीर हक्क!
वर्षानुवर्षे वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला न्याय मावळ तालुक्यातील ठाकर वाडी, शिंदे वस्ती आणि सोमाटणे येथील आदिवासी कुटुंबांना अखेर त्यांच्या संघर्षाला न्याय मिळाला आहे. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे या कुटुंबांना ३/२ कायद्यानुसार कायदेशीर हक्क बहाल करण्यात येणार आहेत. शेकडो वर्षांच्या वाटचालीत जे शक्य झालं नाही, ते महसूल विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून शक्य झालं...











